Family Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या बहराईचमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लोभापोटी एका व्यक्तीने त्याच्या वहिनीला पत्नी बनवलं, भावाची हत्या केली आणि मुलांसोबत असं काही केलं, जे वाचून तुम्हालाही धक्का बसेल. काय आहे संपूर्ण प्रकरण? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. अनिरुद्ध नावाच्या एका व्यक्तीने जमिनीच्या लोभापोटी त्याच्याच मोठा भाऊ संतोषची हत्या केली. संतोषची पत्नी या हत्येची साक्षीदार होती. पण तिच्यावर दबाव टाकून दीराने वहिनीशी लग्न केलं.
ADVERTISEMENT
वहिनी आणि दीराची संपूर्ण कहाणी
सात वर्षांपूर्वी हे प्रकरण सुरु झालं होतं. अनिरुद्धची नजर त्याच्या मोठ्या भावाच्या जमिनीवरच नाही, तर त्याच्या पत्नीवरही होती. त्यामुळे त्याने हत्येचा कट रचून भावाचा खून केला. पण त्याची पत्नी सुमनने त्याला सपोर्ट केला नाही. याऊलट तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. यामुळे अनिरुद्धला जेलमध्ये जावं लागलं. जामीनावर सुटल्यावर त्याने वहिनीशा जबरदस्ती लग्न केलं. सुमनला आधीपासूनच एक मुलगा होता. पण अनिरुद्धने लग्न केल्यानंतर त्याला दोन मुली झाल्या.
हे ही वाचा >> प्रेम..धोका आणि मर्डर! कॅन्सर झालेल्या तरुणाला GF ने सोडलं, संतापलेल्या BF ने प्रेयसीला पेट्रोलने जाळलं अन्..
मुली आणि तिन्ही नातवांना नदीत..
19 ऑगस्ट रोजी सुमनच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीत तिने म्हटलं, तिची मुलगी आणि तीन नातवंड 14 ऑगस्टपासून बेपत्ता आहेत. त्यांना अनिरुद्ध आणि त्याच्या सहकाऱ्यावर संशय होता. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अनिरुद्धला मोतीपूर परिसरातून अटक केली.
तपासात त्याने कबुल केलं की, त्याने 14 ऑगस्ट रोजी सुमन आणि इतर मुलांना मिहींपूरवा येथे बोलावलं होतं. त्यानंतर त्यांना शारदा नदीच्या पूलावर जाऊन नदीत ढकललं. शारदा नदीत पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे की, आतापर्यंत चौघांचे मृतदेह सापडले नाहीत. दरम्यान, अनिरुद्धचा साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा >> गर्लफ्रेंड BF सोबत पहिल्यांदाच फिरायला गेली..रस्त्यातच होत्याचं नव्हतं झालं! कुटुंबियांसह पोलिसांनाही हादरा बसला
ADVERTISEMENT
