मेट्रोमोनी साईटवर Fake प्रोफाईल बनवलं! लग्नाचं आमिष दाखवून महिलेचे अश्लील व्हिडीओ बनवले, नंतर सुरु झाला खतरनाक खेळ

Today Shocking Viral News : मुंबईच्या माझगाव परिसरात 34 वर्षांच्या महिलेसोबत सर्वात धक्कादायक घटना घडली. मॅट्रोमोनी वेबसाईट्सवर एका व्यक्तीने बोगस प्रोफाईल बनवून महिलेला लग्नाचं आमिष दाखवलं होतं.

मेरठ विवाह फसवणूक (प्रतिनिधी प्रतिमा)

Marriage Fraud News

मुंबई तक

• 10:37 PM • 22 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

आरोपीने लग्नासाठी इच्छूक असल्याचं सांगितलं अन्..

point

पोलिसांनी आरोपीवर केला गुन्हा दाखल

point

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?

Today Shocking Viral News : मुंबईच्या माझगाव परिसरात 34 वर्षांच्या महिलेसोबत सर्वात धक्कादायक घटना घडली. मॅट्रोमोनी वेबसाईट्सवर एका व्यक्तीने बोगस प्रोफाईल बनवून महिलेला लग्नाचं आमिष दाखवलं होतं. महिलेचा विश्वास जिंकल्यावर त्याने तिचा अश्लील व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल केलं. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिलेनं लग्नासाठी एका मेट्रोमोनी वेबसाईट्सवर तिचं प्रोफाईल बनवलं होतं. 

हे वाचलं का?

आरोपीने लग्नासाठी इच्छूक असल्याचं सांगितलं अन्..

9 ऑगस्टला महिलेला एक कॉल आला होता. त्यावेळी आरोपीने महिलेला लग्नासाठी इच्छूक असल्याचं सांगितलं. त्याने महिलेशी बोलणं वाढवलं आणि तिचा विश्वास जिंकला. यावेळी आरोपीने चालाखी करत महिलेचे अश्लील फोटो काढले आणि व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याने महिलेला ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक प्रकार सुरु केला.

हे ही वाचा >> सरकारी शाळेत घडली भयंकर घटना! आठवीत शिकणाऱ्या मुलीनं विद्यार्थ्यावर केला चाकूने हल्ला..धक्कादायक कारण आलं समोर!

आरोपी महिलेला व्हिडीओ पाठवला आणि तिच्याकडे आरोपीने पैशांची मागणी केली. जर पैसे दिले नाही, तर सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केला जाईल, अशी धमकीही आरोपीने महिलेला दिली होती. त्यानंतर भीतीपोटी पीडित महिलेनं आरोपीला सुरुवातीला 30 हजार रुपये दिले. पण आरोपीच्या मागण्या वाढत गेल्या. तो सतत पैशांची मागणी करू लागला. जेव्हा महिलेला फसवणूक झाल्याचं कळलं, तेव्हा तिने हिंमत दाखवून भायखळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी आरोपीवर केला गुन्हा दाखल

मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि भायखळा पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या रॅकेटमागे एखादा मोठा गुन्हेगार असू शकतो, असा संशयही पोलिसांनी व्यक्त केला. जे महिलांना निशाणा बनवून अशाप्रकारचे गुन्हे करतात. दरम्यान, पोलिसांनी तपास सुरु केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी लोकांना आवाहन केलं आहे की, अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका. त्यांना खासगी माहिती देऊ नका. जर कोणी धमकी दिली किंवा ब्लॅकमेल केलं, तर तातडीनं पोलिसांना संपर्क साधा. 

हे ही वाचा >> सरकारी शाळेत घडली भयंकर घटना! आठवीत शिकणाऱ्या मुलीनं विद्यार्थ्यावर केला चाकूने हल्ला..धक्कादायक कारण आलं समोर!

    follow whatsapp