Today Shocking Viral News : एका व्यक्तीवर पेट्रोल टाकून त्याला आग लावल्याची धक्कादायक घटना तेलंगणात घडल्याचं समोर आलं. पेट्रोलच्या आगीत गंभीर जखमी झालेल्या पतीला त्याच्या पत्नीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सुधाकर रेड्डी असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. रुग्णालयात उपचार घेत असताना काही दिवसांनी सुधाकरच्या तब्येतीत सुधारणा होते. पण त्याचा चेहरा पूर्णपणे खराब झाल्याचं उघडकीस येतं. त्यानंतर डॉक्टरांनी पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांना सल्ला दिला की, सुधीरचा चेहरा ठीक करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी आणि लिक्विड डाएड सुरु करावं लागेल. त्यानंतर सुधीरची पत्नी स्वाती या उपचारासाठी तयार झाली.
ADVERTISEMENT
सुधाकरने सूप पिण्यास नकार दिला अन् नंतर घडलं..
सुधाकरला मटण सूप खूप आवडायचा. त्यामुळे त्याच्या आईने रुग्णालयात त्याला मटण सूप आणलं होतं. पण सुधाकरने तो सूप पिण्यास नकार दिला. त्यामुळे सुधाकरचा भाऊ सुरेंद्रच्या मनात संशयाची सुई फिरकली. सुधाकरचा चेहरा 30 टक्के जळाला होता. पण त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली होती. पण एक दिवस सुरेंद्रने सुधाकरवर झालेल्या हल्ल्याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्याने पोलिसांना सांगितलं की, सुधाकरला मटण सूप खूप आवडतो. पण त्याने ते सूप पिण्यास नकार दिला.
हे ही वाचा >> बीड: एक बॉयफ्रेंड आणि दोघी जणी... होमगार्ड महिला 'त्याच्या' जवळ गेली अन् मैत्रिणीने केलं भलतंच!
त्यानंतर पोलिसांचाही गोंधळ उडाला. कारण सुरेंद्रने सांगितलं की, जो व्यक्ती रुग्णालयात एडमिट आहे, तो त्याचा भाऊ सुधाकर नाही. दुसरा कोणीतरी आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स घेतले. त्यानंतर काही दिवसांनी कळलं की, फिंगरप्रिंट्स मिसमॅच झाले. त्यानंतर पोलिसांनी स्वातीला पोलीस स्टेशनला बोलावलं. त्यानंतर पोलिसांनी तिला घडलेल्या प्रकाराबाबत सर्वकाही विचारलं.
फिजिओथेरेपिस्ट राजेशसोबत अफेअर सुरु झालं अन् नंतर..
स्वातीचं 2014 मध्ये सुधाकरसोबत लग्न झालं होतं. सुधाकर उद्योगपती होता आणि स्वाती हॉस्पिटलमध्ये नर्स होती. एक दिवस स्वातीला बॅक पेन झाल्यावर सुधाकरने स्वातीला फिजिओथेरेपिस्टला भेटण्यासाठी सांगितलं. राजेश असं त्या डॉक्टरचं नाव होतं. स्वातीने राजेशची भेट घेतल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्यात अफेअर सुरु झालं. त्यामुळे त्या दोघांच्या मनात वेगवेगळे प्लॅन सुरु होते. स्वातीने प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून राजेशला सुधाकर बनवण्याचा कट रचला.
हे ही वाचा >> मुंबईची खबर: प्रतिक्षा संपली...अटल सेतूवर 'या' वाहनांना 'नो टोल'! जाणून घ्या, A टू Z माहिती
सुधाकर एक दिवस घरी एकटाच होता. त्या दिवशी नर्स स्वातीने त्याला एनेस्थिसीयाचं इंजेक्शन दिलं आणि बेशुद्ध केलं. त्यानंतर राजेशला घरी बोलावलं आणि त्यांनी लोखंडी रॉडने हल्ला करून सुधाकरला मारलं आणि त्याचा चेहरा खराब केला. त्यानंतर मृतदेह महबूब नगरच्या जंगलात फेकला. त्यानंतर स्वातीने प्लास्टिक सर्जरी करून राजेशला सुधाकरसारखं बनवलं. पण चेहऱ्यावर अॅसिड टाकल्यावर राजेशचा चेहरा जळला आणि स्वातीने त्याला सुधाकर म्हणून रुग्णालयात दाखल केलं. राजेश शाकाहारी होता, म्हणून त्याने मटण सूप पिण्यासाठी नकार दिला. तेव्हा या संपूर्ण घटनेचा पर्दाफाश झाला.
ADVERTISEMENT
