बीड: एक बॉयफ्रेंड आणि दोघी जणी... होमगार्ड महिला 'त्याच्या' जवळ गेली अन् मैत्रिणीने केलं भलतंच!

Home Guard Woman Murder Case : बीडमध्ये सर्वात भयंकर घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. होमगार्ड महिलेचा खून झाल्याने बीड पुन्हा हादरलं आहे. प्रेम प्रकरणातून एका होमगार्ड महिलेनं तिच्याच मैत्रिणीची हत्या केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे.

Beed Shocking Murder Case

Beed Shocking Murder Case

मुंबई तक

22 Aug 2025 (अपडेटेड: 22 Aug 2025, 05:40 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकरासाठी दोन महिलांमध्ये झाला मोठा वादविवाद

point

प्रियकरासोबत वाद झाला आणि होमगार्ड महिलेला संपवलं अन्..

point

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?

Home Guard Woman Murder Case: बीडमध्ये सर्वात भयंकर घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. होमगार्ड महिलेचा खून झाल्याने बीड पुन्हा हादरलं आहे. प्रेम प्रकरणातून एका होमगार्ड महिलेनं तिच्याच मैत्रिणीची हत्या केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे.  अयोध्या वरकटे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर वृंदावनी फरताळे असं आरोपी महिलेचं नाव आहे. 

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, आयोध्या वरकटे गेवराई येथे होमगार्ड म्हणून कार्यरत होत्या. पोलिसांनी अटक केलेली आरोपी वृंदावनी फरताळे आणि मृत अयोध्या या दोघीही मैत्रिणी होत्या. दोघीही एकाच तरुणावर प्रेम करायच्या. पण अयोध्या प्रेमात अडथळा ठरत असल्याने वृंदावनीने घरी बोलावून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह परिसरातील नाल्यात फेकून दिला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी महिलेच्या मुसक्या आवळल्या असून या हत्या प्रकरणात तिच्या प्रियकराचा समावेश आहे का? याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे, अशी माहिती बीडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन क्षीरसागर यांनी दिली. 

हे ही वाचा >> ‘ती’ 40 मिनिटं… महाराष्ट्राचं राजकारण बदलणार? राज ठाकरे-फडणवीसांची बंद दाराआडची चर्चा अन्..

प्रियकरासोबत वाद झाला आणि होमगार्ड महिलेला संपवलं, पण नंतर..

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर तरुणासोबत वाद झाल्याने होमगार्ड महिलेचा खून झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं. मृत अयोध्या गेवराई तालुक्यातील लुखामसला येथे राहत होती. अयोध्या काही दिवसांपूर्वी होमागार्डमध्ये भरती झाली होती. दरम्यान, अयोध्याची मैत्रिण फरताळेचं राठोड नावाच्या तरुणावर प्रेम होतं. परंतु, राठोड आणि अयोध्याची जवळीक वाढल्याने वृंदावनीला राग आला आणि तिने अयोध्याचा खून करण्याचा कट रचला. 

दोन दिवसांपूर्वी वृंदावनीने अयोध्याला घरी बोलावलं. त्यानंतर तिने अयोध्याचा गळा दाबून तिचा खून केला. वृंदावनीच्या मुलाने अयोध्याचा मृतदेह खोक्यात टाकला आणि नंतर शहराजवळील नाल्यात फेकून दिला. त्यानंतर गुरुवारी सकाळी लोकांना तो मृतदेह दिसला. त्यानंतर स्थानिक लोकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास करत आरोपी वृंदावनीला अटक केली. 

हे ही वाचा >> Govt Job: आता मुंबई हायकोर्टात मिळवा नोकरी... 'या' पदांसाठी निघाली भरती! कधीपर्यंत कराल अर्ज?

    follow whatsapp