Today Shocking Viral News : उदयपूरच्या पोक्सो (POCSO) कोर्टाने महत्त्वाचा निर्णय सुनावला आहे. कोर्टाने अल्पवयीन मुलासोबत लैंगिक शोषण करणाऱ्या दोषी महिलेला 20 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. याचसोबत महिलेला 10 हजार रुपयांचं दंडही ठोठावलं. विशेष बाब म्हणजे, उदयपूरचं हे पहिलं प्रकरण आहे, ज्यामध्ये पोक्सो कोर्टाने एखाद्या महिलेला दोषी ठरवत एवढी शिक्षा सुनावली आहे.
ADVERTISEMENT
त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं?
स्पेशल पब्लिक प्रॉसिक्यूटर महेंद्र ओझा यांनी म्हटलं की, ही घटना वर्ष 2023 मध्ये घडली. प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत म्हटलंय की, कानोड येथे राहणारी महिला शेखा बानूने 17 वर्षांचा मुलाला नशेत असताना तिच्यासोबत ठेवलं होतं आणि अनेकदा त्याचं लैंगिक शोषण केलं. 12 मार्च 2023 रोजी कुटुंबियांनी अल्पवयीन मुलाला उदयपूरच्या सवीना कृषी मंडी येथे असणाऱ्या एका हॉटेलमध्ये महिलेसोबत रंगेहाथ पकडलं होतं.
हे ही वाचा >> मुंबई हादरली! नवऱ्याला बायकोसोबत एकांत मिळेना, मुलगी यायची सतत नात्याच्याआड, नंतर गळा दाबून मृतदेह फेकला समुद्रात
अल्पवयीनच्या कुटुंबियांनी तक्रारीत म्हटलं होतं की, महिला त्यांच्या अल्पवयीन अंमली पदार्थ देऊन त्यांचं लैंगिक शोषण करायची. त्यानंतर ती फोटो आणि व्हिडीओही काढायची. त्यानंतर हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सतत लैंगिक शोषण करत होती. पोलिसांनी या प्रकरणी तपास करत शेखा बानूला अटक केली. त्यानंतर कोर्टात हजर केल्यानंतर महिलेविरोधात 15 साक्षीदार हजर केले.
महिलेच्या मोबाईलमध्ये सापडले अश्लील फोटो आणि व्हिडीओ
महिलेच्या मोबाईलमधून अल्पवयीन मुलाचे अश्लील फोटो आणि व्हिडीओही जप्त करण्यात आले. याच माध्यमातून तिने ब्लॅकमेल करत, अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केलं. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर जज संजय भंडारी यांनी महिलेला दोषी ठरवत, तिला 20 वर्षांची शिक्षा सुनावली आणि दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
हे ही वाचा >> कल्याण-डोंबिवलीची कहाणी: शिंदे-चव्हाण पुढारी असलेल्या KDMC ची एवढी दैना झाली तरी कशी?
ADVERTISEMENT
