Crime news : देशात महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्याचं कारणंही तसंच आहे. राजस्थानातून एक धक्कादायक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पोलिसांनी बिहारमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला चौदा वर्षांपूर्वी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती . त्यानंतर त्या नराधमानं गेली 14 वर्षे बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगली. पुन्हा बाहेर आल्यानंतर तेच कृत्य केलं. आरोपीचे नाव मोहम्मद अरशद असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरात दोन्ही गटात तुफान राडा, आधी दगडफेक नंतर वाहनंच पेटवली, पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची नजर लागली?
नेमकं काय घडलं?
आरोपी नराधमाने 2007 मध्ये एका अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केला होता. त्यानंतर मोहम्मद अरशदला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि चौदा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर तो पुन्हा तुरुंगातून बाहेर आला असता, त्याने पुन्हा नको तेच केलंय. एका 15 वर्षीय अल्पवयीन चिमुरडीवर त्यानं लैंगिक अत्याचार केलेत.
2024 मध्ये तुरुंगातून बाहेर अन् पुन्हा विकृतीची परिसीमी
संबंधित प्रकरणात सांगण्यात येत आहे की, आरोपी मोहम्मद अरशद हा 2024 मध्ये तुरूंगातून बाहेर आला होता. त्यानंतर त्याने एका अल्पवयीन मुलीला दत्तक घेतलं आणि तिची काळजी घेईल असं वचन दिलं. पण तो नराधम अल्पवयीन मुलीवर दीड वर्ष बलात्कार करतच राहिला. आरोपी पीडितेला धमकावत कोणालाही काहीही सांगू नकोस असं सांगू लागला. पण नंतर अल्पवयीन पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला.
हे ही वाचा : पत्नी होती जिमला अन् बिजनेस पार्टनर पती एकटाच होता घरात, नंतर पत्नी येताच रक्ताच्या थारोळ्यात पती, नेमकं काय घडलं?
पीडितेच्या आईने 25 जून रोजी शिवर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असता, हे प्रकरण समोर आलं. संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांना कळताच आरोपी फरार झाला आणि तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अलीकडेच त्याला नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
