कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहा प्यायली अन् थेट व्हेटिंलेटवर उपचार सुरु, नेमकं विद्यार्थिनीसोबत काय घडलं?

Jharkhand News : एका विद्यालयातील कँटीनमध्ये चहा प्यायल्याने विद्यार्थिनीची तब्येत बिघडली असता, तरुणीला थेट व्हेंटिलेटरवर उपचार देण्यात आले आहेत.

Jharkhand News

Jharkhand News

मुंबई तक

23 Aug 2025 (अपडेटेड: 23 Aug 2025, 01:56 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कँटीनमध्ये चहा प्यायल्याने विद्यार्थिनीची तब्येत बिघडली

point

तरुणीला थेट व्हेंटिलेटरवर उपचार

Jharkhand News : एका विद्यालयातील कँटीनमध्ये चहा प्यायल्याने विद्यार्थिनीची तब्येत बिघडली असता, तरुणीला थेट व्हेंटिलेटरवर उपचार देण्यात आले आहेत. ही घटना झारखंड येथील राजेंद्र इन्स्टिस्ट्यूट येथे गुरूवारी रात्री घडली आहे. संबंधित प्रकरणात झारखंडचे आरोग्यमंत्री इरफान अन्सारी यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधत माहिती दिली.

हे वाचलं का?

हे ही वाचा : कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरात दोन्ही गटात तुफान राडा, आधी दगडफेक नंतर वाहनंच पेटवली, पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची नजर लागली?

ते म्हणाले की, या प्रकरणाची वैयक्तिकरित्या चौकशी करण्यात येईल. त्यांनी सांगितलं की, अन्न आणि प्येयांच्या गुणवत्तेबाबत कसलीही तडजोड केली जाणार नाही. मात्र, एका चहामुळे राजेंद्र इन्स्टिस्ट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधील पदव्युत्तर विद्यार्थीनी गुरूवारी गांभीर आजारी पडली.

विद्यार्थिनीला केरोसीनसारखा वास येत होता

राजेंद्र इन्स्टिस्ट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे जनसंपर्क अधिकारी डॉ. राजीव रंजन यांनी आज तक या माध्यमाशी बोलताना सांगितलं की, जेव्हा विद्यार्थिनीने कॅन्टीनमझून मागवलेला चहा प्यायला असता, पीडित विद्यार्थिनीला केरोसीनसारखा वास येत होता. त्यानंतर पीडितेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. तिला ताबडतोब उपचारासाठी नेण्यात आले आणि नंतर क्रिटिकल केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले.

विद्यार्थिनी व्हेंटिलेटरवर

राजेंद्र इन्स्टिस्ट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे प्रवक्ते डॉ. राजीव रंजन यांनी घटनेची पुष्टी केली आणि सांगितलं की, विद्यार्थिनी व्हेंटिलेटरवर आहे आणि तिची प्रकृती चिंताजनक आहे. ती अचानक बिघडण्याचे कारण काय होते याची चौकशी सुरु करण्यात आली. त्यानंतर ते म्हणाले की, क्रिटिकल केअर युनिटमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत आणि तिची प्रकृती अद्यापही गंभीर आहे.

हे ही वाचा : अल्पवयीन गुन्हेगाराकडून दहा वर्षीय मुलीच्या गळ्यावर चाकूने अठरा वेळा सपासप वार, क्राईम सीरीज पाहून केलं कांड, नेमकं काय घडलं?

वृत्तसंस्थांनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे प्रकरण एक साधे अन्न विषबाधा नसून काहीतरी वेगळंच आहे. विद्यार्थिनी रात्रपाळी म्हणून कार्यरत होती. तेव्हा डॉक्टरांनी कॅन्टीनमधून चहा मागवला होता.

    follow whatsapp