Extra marital affairs : विवाहित महिलेनं धक्कादायक कृत्य केलं आहे. तिनं 15 दिवस आपल्या पतीसोबत आणि 15 दिवस आपल्या बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा निर्णय घेतला. सांगण्यात येतंय की, महिला एक दोन वेळा नाही,तर तब्बल 10 वेळा आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली होती. पण दरवेळी पती तिचा शोध घ्यायचा आणि पुन्हा घरी आणायचा. हे प्रकरण पंचायतीला समजताच पंचायतीकडे महिलेनं धक्कादायक मागणी ठेवली, ते ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्काच बसेल. पती आपल्या पत्नीचं कृत्य पाहून हैरान झाला होता. त्यानंतर त्यानं माफी मागितली आणि आपल्या बॉयफ्रेंडसोबतच राहण्यास सांगितलं.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
या पूर्ण प्रकरणात अजीमनगर आणि टांडा क्षेत्रातील असलेली दोन गावं जोडली गेलेली आहेत. अजीमनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील तरुणीचा दीड वर्षांपूर्वीच एका तरुणाशी विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसानंतर टांडा क्षेत्रातील रहिवासी असलेल्या तरुणासोबत तिचं सूत जुळलं. 1 वर्षाआधी तरुणी आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली होती. पंचायतीने दखल घेत महिला पुन्हा पतीकडे आली. यानंतर तरुणी ही बॉयफ्रेंडसोबत पळून गेली होती. एका वर्षात ती 10 वेळा बॉयफ्रेंडसोबत पळून गेली होती.
घडलेल्या घटनेनुसार, 8 दिवसांपूर्वीच महिला बॉयफ्रेंडसोबत पळून गेली होती. तेव्हा तिचा पती पोलीस ठाण्यात गेला असता, त्यानं पोलिसांना कसलीही कारवाई न करण्यास सांगितली. तसेच पोलिसांकडे पुन्हा पत्नीला शोधून आणण्याचं निवेदन केलं. पोलिसांनी या प्रकरणात तपास केला आणि महिलेला आपल्या ताब्यात घेतलं.
हे ही वाचा : मुंबईत हळहळ! जवळच्या नातेवाईकानेच काढला काटा, आधी अपहरण अन् नंतर हत्या, एसी कोचच्या शौचालयात लहान मुलाचा मृतदेह
15 दिवस पतीकडे आणि 15 दिवस बॉयफ्रेंडकडे
सांगण्यात येतंय की, महिला रात्री आपल्या पतीजवळच होती. त्यानंतर ती अचानकपणे आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली होती. हे पाहून पती बॉयफ्रेंडच्या घरी गेला होता. तेव्हा त्याच ठिकाणी महिला तरुणीही होती. तिनं पुन्हा येण्यास पतीला नकार दिला होता. याचप्रकरणात ग्रामस्थांनी पंचायतीत निर्णय घेतला. त्या पंचायतीत पत्नीनं धक्कादायक मागणी केली. ती 15 दिवस पतीकडे आणि उर्वरित 15 दिवस बॉयफ्रेंडकडे राहील. हे ऐकून पतीनं पत्नीसमोर हात जोडले आणि बॉयफ्रेंडसोबत राहा असं सांगितलं.
ADVERTISEMENT
