Crime News : ओडिशातील बालासोमध्ये एक मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 23 वर्षीय तरुणीचं एका तरुणाने अपहरण केलं. त्यानंतर तिला सहा महिने एका बंदीस्त ठिकाणी ठेवले आणि तिचा छळ केला. पीडितेनं सांगितलं की, गेली सहा महिने अनेक तरुणांनी तिचं लैंगिक शोषण केलं. त्यानंतर तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केला. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटनेत आपली मुलगी एका मुलासोबत पळून गेली असा आईला संशय होता. पण जेव्हा खरं प्रकरण समोर आलं तेव्हा तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीड जिल्ह्यात टोळक्यांनी आईसह लेकीवर लोखंडी पाईप अन् रॉडनं केला हल्ला, जनावरासारखं काळं निळं होईपर्यंत मारलं
पीडित तरुणीवर गेली सहा महिने अत्याचार सुरु
पीडित तरुणीवर गेली सहा महिने अत्याचार सुरु होते. आपली आईला मुलगी ही बेपत्ता असल्याचा आईला संशय बळावला गेला. जेव्हा आईला खरी माहिती मिळाली असता, तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आपली मुलगी एका मुलासोबत पळून गेल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आईने मुलीवरही गंभीर आरोप केले. आपलीच मुलगी तब्बल 3 लाख रुपये घेऊन पळून गेल्याचा आईनं आरोप केला. कुटुंबातील सदस्यांना वाटले की, मुलगी स्वत:च्या मर्जीनेच घराबाहेर पडली होती. पण खरं वास्तव समोर आल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.
बंदीस्त ठिकाणाहून पीडितीनं काढला पळ अन्...
पीडितेनं सांगितलं की, ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा भागात एका ठिकाणी बंदिस्त ठेवण्यात आले होते. त्याच ठिकाणी तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आले होते. तसेच तिच्यावर अनेकदा क्रर कृत्य केले होते. त्यानंतर तिनं धाडसी वृत्ती दाखवून तिथून कसा बसा पळ काढला. त्यानंतर तिने भोगराई पोलीस ठाणे गाठलं आणि तिच्यासोबत घडलेला अनुभव तिनं सांगितला होता.
हे ही वाचा : विरारमध्ये जीर्ण झालेली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली आईसह लेकीचा मृतदेह, क्षणार्धात अनेक कुटुंबं हरपली
पोलिसांनी पीडितेला बालासोरा येथील एका पुनर्वसन केंद्रात दाखल केले. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. संबंधित प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या घृणास्पद कृत्याने कटात आणि हैवानी कृत्य केलेल्या सर्व आरोपींचा सध्या शोध सुरु आहे. त्यांना लवकर अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
