Couple Shocking Viral News : फरिदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने मित्राच्या पत्नीला मनालीला फिरायला नेलं होतं. त्यानंतर त्याच्या मित्राला खूप टेन्शन आलं. मित्राने त्या व्यक्तीवर फायरिंग केली अन् त्याला जखमी केलं. दरम्यान, आरोपीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आलीय. ही धक्कादायक घटना ग्रेटर फरीदाबाद येथील सेक्टर 70 मध्ये घडली.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश कुमार (45) फरीदाबाद येथील सेक्टर 10 मध्ये राहतो. त्याचा दारूचा व्यवसाय आहे. शहरात त्याचे दारूचे अनेक स्टॉल्स, स्पा सेंटर आणि सलून्स आहेत. तर आरोपी विनोद कौशिक (30), बल्लभगड येथील जुनहेडा येथील रहिवासी आहे. तो फरीदाबादच्या सेक्टर 2 मध्ये एक रेस्टॉरंट कॅफे चालवतो.
रिपोर्टनुसार, बुधवारी एक ते दीड वाजताच्या सुमारास, सेक्टर 70 च्या KJL सोसायटीच्या बाहेर एक धक्कादायक घटना घडली. सुरेश त्याची पत्नी दुरेश, बॉडीगार्ड सोनू कुमार आणि विनोदची पत्नी मेघासोबत चार दिवसांच्या मनाली ट्रीपवरून घरी परतला होता. मेघा पती विनोदशी वाद विवाद झाल्यानंतर सोनूच्या कुटुंबासोबत राहत होती. यामुळे विनोज खूप नाराज होता.
हे ही वाचा >> बीड जिल्ह्यात टोळक्यांनी आईसह लेकीवर लोखंडी पाईप अन् रॉडनं केला हल्ला, जनावरासारखं काळं निळं होईपर्यंत मारलं
विनोदने झाडल्या तीन गोळ्या आणि..
सुरेश त्याच्या कारमाधून सोसायटीच्या आवारात उतरला, त्यावेळी विनोद आणि त्याचा साथीदार आधीपासूनच कारमध्ये वाट पाहत होते. जेव्हा सोनू आणि अन्य लोक सामान उतरत होते, विनोदने सुरेशवर तीन गोळ्या झाडल्या. सोनूने विनोदला पकडण्याचा प्रयत्न केला, पण विनोदने त्याच्यावर हल्ला केला आणि फरार झाला.
विनोद-मेघाचं लव्ह मॅरेज
पोलिसांच्या तपासात समोर आलं की, विनोद आणि मेघाचं एक वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज झालं होतं. मेघा सुरेशच्या एक सलूनमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होती. ती नेहमी सुरेशसोबत बाहेर जायची. विनोद या गोष्टींचा विरोध करायचा. या गोष्टीवरून दोघांमध्ये वादविवाद झाले. पण जेव्हा मेघा सुरेश सोबत मनालीला ट्रीपला गेली, तेव्हा विनोद संतापला. त्यामुळे त्याने सुरेशवर गोळ्या झाडल्या.
हे ही वाचा >> पत्नीचं अफेअर असल्याचा संशय आला..पतीने पत्नीला रुममध्ये जीवंत जाळलं! 7 वर्षांच्या मुलीनं पोलिसांना सगळंच सांगितलं
त्यानंतर सुरेशला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुरेशची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी विनोद आणि त्याच्या अन्य साथीदाराविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचं पथक आरोपीचा तपास करत आहेत. पण ते अजूनही फरार आहेत. पोलिसांचं म्हणणं आहे की, हे प्रकरण कौंटुबीक वादविवादाचं आहे. विनोद आणि मेघा यांच्यात आधीपासूनच वादविवाद होत होते.
ADVERTISEMENT
