मैत्रिणीनं भेटण्याच्या बहाण्यानं तिला बोलावलं, खोलीत शिरताच शाकीबाचा मित्र अलीने नको तेच...हादरून टाकणारी घटना

crime news : एका तरुणीने आपल्या मैत्रिणीवर गंभीर आरोप केला आहेत. तिने केलेल्या गंभीर आरोपानुसार, तिच्या मैत्रिणीने तिला भेटण्याच्या बहाण्याने फोनद्वारे संपर्क करत बोलावले. त्यानंतर तिच्या प्रियकराशी जबरदस्ती शरीरसंबंध ठेवण्याच भाग पाडले.

crime news

crime news

मुंबई तक

29 Aug 2025 (अपडेटेड: 29 Aug 2025, 04:59 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणीचे मैत्रिणीवर गंभीर आरोप

point

जबरदस्ती शरीरसंबंध ठेवण्याच भाग पाडले

point

नेमकं काय घडलं?

crime news : एका तरुणीने आपल्या मैत्रिणीवर गंभीर आरोप केले आहेत. तिने केलेल्या गंभीर आरोपानुसार, तिच्या मैत्रिणीने तिला भेटण्याच्या बहाण्याने फोनद्वारे संपर्क साधत बोलावले. त्यानंतर तिच्या प्रियकराशी जबरदस्ती शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. एवढंच नाही,तर या घटनेचा अश्लील व्हिडिओ शूट केला. संबंधित प्रकरणात पीडित तरुणीनं पोलीस ठाणे गाठत एफआर दाखल केला. तपासानंतर पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आरोपी मैत्रिणीचं नाव शाकीबा असे आहे. तर ज्या तरुणानं लैंगिक शोषण केलं त्याचं नाव अली असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'आता पाटील म्हणतील तसं..', अखेर मनोज जरांगे आझाद मैदानावर धडकले, मराठा आंदोलकांचा मुंबईत एल्गार

मला मैत्रिणीशी शरीरसंबंध ठेवायचेत

पीडित विद्यार्थिनीने सांगितलं की, मंगळवारी तिच्या शाकीबा नावाच्या एका मैत्रिनीने कैसरबाग येथे बोलावले होते. तिथे भेटल्यानंतर शकीबाने तिला तिचा बॉयफ्रेंड आलीच्या खोलीत बोलावून घेतलं. त्यानंतर अली खोलीत आला आणि त्याने शाकीबाला तरुणीशी शरीर संबंध ठेवण्याबाबत सांगितलं. तरुणीने नकार दिल्यानंतर शाकीबाने तिला धमकी दिली आणि म्हणाली की, नकार देऊ नकोस नाहीतर मी तुला कुठेच जाऊ देणार नाही.

जबरदस्ती शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले 

यानंतर शाकीबाने पीडितेला धमकावले आणि मित्राशी शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती केली, असा आरोप आहे. घटनेनंतर शाकीबाने पीडितेला ऑटोमध्ये बसवून घरी पाठवले. त्यानंतर भयभीत झालेल्या पीडितेनं घरी पोहोचल्यानंतर घडलेला सर्व प्रकार हा आपल्या कुटुंबाला सांगितला. कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केली.

हे ही वाचा : परभणी हादरली! नवऱ्याने बायकोचा स्टेट्स ठेवत लिहिलं भावपूर्ण श्रद्धांजली, नंतर बारा वेळा चेहऱ्यावर अन् पोटावर गेले वार

दरम्यान, या प्रकरणावर डीसीपी पश्चिम विश्वजीत श्रीवास्तव यांनी सांगितलं की, पीडितेनं दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे एफआरआय नोंदवण्याचे काम केलं आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.

    follow whatsapp