नागपूर: नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलमोहर कॉलनीत एका 16 वर्षीय विद्यार्थिनीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांना आहे. मृतक मुलगी दहावीत शिकत असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
हत्या झालेली विद्यार्थीनी अजनी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शाळेतील विद्यार्थिनी आहे. ती शाळेतून घरी परत जाण्यास निघाली असताना एका अल्पवयीन आरोपीने तिची वाट अडवली. कुणाला काही कळण्यापूर्वीच आरोपीने मुलीवर चाकूने सपासप वार केले, ज्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत ती खाली कोसळली आणि घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला.
हे ही वाचा>> परभणी हादरली! नवऱ्याने बायकोचा स्टेट्स ठेवत लिहिलं भावपूर्ण श्रद्धांजली, नंतर बारा वेळा चेहऱ्यावर अन् पोटावर गेले वार
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अजनी पोलीस ठाण्याचे निरीक्षक, पोलीस कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मुलीवर चाकूने वार केल्यानंतर आरोपी लगेचच घटनास्थळावरून पसार झाला. आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांचे अनेक पथक रवाना झाले आहेत.
नेमकी घटना काय?
आज (29 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास ही भयंकर घटना घडली. अल्पवयीन मुलगी शाळेतून सुटल्यानंतर आपल्या घराच्या दिशेने निघाली. त्याचवेळी आरोपी मुलगा हा त्याच रस्त्यावर आपल्या दुचाकीवर तिची वाट पाहत होता. मुलीला समोरून येताना पाहताच त्याने तिच्या दिशेने जात तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण मुलीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती पुढे जाऊ लागली. या गोष्टीचा मुलाला प्रचंड राग आला आणि त्याने थेट त्याच्याजवळ लपवलेला चाकू काढून तिच्यावर छातीवर थेट वार करण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा>> पत्नीचं अफेअर असल्याचा संशय आला..पतीने पत्नीला रुममध्ये जीवंत जाळलं! 7 वर्षांच्या मुलीनं पोलिसांना सगळंच सांगितलं
या झालेल्या आघाताने तरूणी काही क्षणात खाली कोसळली. पण आरोपी मुलगा तरीही थांबला नाही. त्याने त्यानंतरही मुलीवर चाकूने वार करणं सुरूच ठेवले. हे वार मुलीच्या वर्मी बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी मुलाने आपली दुचाकी तिथेच सोडून फरार झाला. जो अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही.
आरोपी आणि मृत मुलगी हे आधीपासून एकमेकांना ओळखत होते. पण त्याची वर्तवणूक चांगली नसल्याने तिने त्याच्याशी कोणतेही संबंध ठेवले नव्हते. मात्र, एकतर्फी प्रेमातून आरोपी मुलीलाल सतत त्रास देत होता. आज देखील हत्येपूर्वी आरोपीने विद्यार्थिनीला वारंवार फोन केले होते.
दरम्यान, शाळा सुटल्यानंतर मुलगी घरी जात असताना आरोपीने तिला वाटेतच गाठले आणि काही समजण्यापूर्वी आरोपीने तिच्यावर चाकूने वार केले. या घटनेबाबत पोलिसांनी सध्या तरी कोणतीही माहिती आणि प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
ADVERTISEMENT
