वहिणीसोबतच्या अफेअरला आईचा विरोध, धाकट्या मुलाने 'असा' दूर केला अडथळा; नेमकं काय घडलं?

Crime News : एका पोत्यात 55 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासातच या हत्यचा उलगडा केला आहे. तपासादरम्यान असे समोर आले की, या महिलेचा धाकटा मुलगा आणि सुनेनं तिचा खून केला असल्याचे तपासात समोर आले. धाकट्या मुलाच्या अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 11:18 AM • 13 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

वहिणीसोबतच्या अफेअरला आईचा विरोध

point

धाकट्या मुलाने 'असा' दूर केला अडथळा

point

नेमकं काय घडलं?

Crime News : एका पोत्यात 55 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासातच या हत्यचा उलगडा केला आहे. तपासादरम्यान असे समोर आले की, या महिलेचा धाकटा मुलगा आणि सुनेनं तिचा खून केला असल्याचे तपासात समोर आले. धाकट्या मुलाच्या अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हमीदा खातून असं मृत महिलेचं नाव आहे. गुजरातच्या सुरतमधील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'अहो, मला भजी खायची आहेत..', नवऱ्याला कॅन्टीनमध्ये पाठवलं, अन् नवविवाहिता इमरानसोबत पळून गेली!

वहिणीसोबतच्या अनैतिक संबंधाला आईचा विरोध

मृत महिलेच्या धाकट्या मुलाचे नाव परवेझ असे आहे. परवेझचे त्याच्या मोठ्या भावाच्या बायकोशी म्हणजेच वहिणीशी अनैतिक संबंध होते. या संबंधांना त्याची आई सतत विरोध करायची. त्यामुळे वैतागलेल्या परवेझने आणि त्याची वहिणी शबाना यांनी मिळून आईच्या हत्येचा कट रचला. यामध्ये शबानाच्या वडिलांचीही त्यांनी मदत घेतली. 10 मार्च रोजी या तिघांनी गळा दाबून हमीदा यांची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह घरातच लपवून ठेवला. धक्कादायक म्हणजे, हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी आरोपी मुलगा परवेझ स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचला आणि आपली आई कपडे आणण्यासाठी बाजारात गेली असता बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार नोंदवली.

दोरीवरुन लागला सुगावा

11 मार्च रोजी दुपारी आरोपींनी मृतदेह एका पोत्यात बांधला आणि हनुमान मंदिराजवळ फेकून दिला. तपासादरम्यान पोलिसांना ज्या दोरीने मृतदेहाचे हात-पाय बांधले होते, त्यावरून महत्त्वाचा सुगावा लागला. मृत महिलेच्या घराची झडती घेतली असता, पोलिसांना तिथे तशीच दोरी सापडली. याशिवाय परवेझ आणि शबाना यांच्या जबाबात तफावत आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच दोघांनीही हत्येचा कट आणि गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने परवेझ आणि शबाना यांना सुरतमध्येच अटक केली.

हे ही वाचा : Astrology : आज शनीचा अस्त होणार, पुढील 35 दिवस 'या' राशीच्या लोकांनी सतर्क रहा; अन्यथा..

शबानाच्या वडिलांना बिहारमधून अटक

या हत्येमध्ये सहभागी असलेला शबानाचा पिता फिरोज आलम हा गुन्हा केल्यानंतर बिहारला पळून गेला होता. मात्र, सुरत क्राईम ब्रँचने पाळत ठेवून आणि बिहार एसटीएफच्या मदतीने त्याला पाटणा रेल्वे स्थानकावरून बेड्या ठोकल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये फिरोज मृतदेह पोत्यात भरून नेताना स्पष्टपणे दिसून आला होता. सुरत क्राईम ब्रँचच्या डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तिन्ही मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.

    follow whatsapp