व्यसनमुक्त केंद्रातील रुग्णाने औषध घेण्यास दिला नकार, 32 वर्षीय रुग्णाला उपचार देण्याऐवजी आरोपींनी संपवलं

Crime News : एका रुग्णावर कर्मचाऱ्यांनी उपचार करण्याऐवजी त्याला मारहाण करत ठार केले. ही घटना एका व्यसनमुक्त केंद्रातील आहे, जिथे औषध घेण्यास नकार दिल्याने चार कर्मचाऱ्यांनी एका 32 वर्षीय रुग्णाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी सध्या चारही आरोपींना अटक केली आहे, ज्यात दोन समुपदेशक एक वॉर्ड बॉय आणि एक ड्रायव्हरचा समावेश आहे.

crime news

crime news

मुंबई तक

• 07:00 AM • 13 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

रुग्णावर कर्मचाऱ्यांनी उपचाराऐवजी केली मारहाण

point

हत्येत नेमका कोणाचा समावेश?

Crime News : एका रुग्णावर कर्मचाऱ्यांनी उपचार करण्याऐवजी त्याला मारहाण करत ठार केले. ही घटना एका व्यसनमुक्त केंद्रातील आहे, जिथे औषध घेण्यास नकार दिल्याने चार कर्मचाऱ्यांनी एका 32 वर्षीय रुग्णाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी सध्या चारही आरोपींना अटक केली आहे, ज्यात दोन समुपदेशक एक वॉर्ड बॉय आणि एक ड्रायव्हरचा समावेश आहे. ही घटना गुजरातमधील सूरतमध्ये घडल्याचे वृत्त आहे.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : अल्पवयीन मुलीचे जत्रेतून अपहरण, औषध पाजून आळीपाळीने सामूहिक अत्याचार, कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली

रुग्णावर कर्मचाऱ्यांनी उपचाराऐवजी मारहाण करत संपवलं

पोलिसांनुसार, ही घटना डुमार परिसरातील व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्रात घडली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त श्वेता डॅनियल यांनी सांगितले की, धवल राठोड (वय 32) यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या चार जणांमध्ये दोन समुपदेशक, एक वॉर्ड बॉय आणि एका ड्रायव्हरचा समावेश आहे. धवल राठोडला 28 फेब्रुवारी रोजी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. 

औषध घेण्यास आरोपीचा नकार 

डॅनियल म्हणाले की, ''राठोड यांनी औषध घेण्यास नकार दिला, नंतर त्यांनी मारहाण केली. 1 मार्च रोजी रात्री त्यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हा त्यांना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने नवीन सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले होते, तिथे त्यांना मृत घोषित केले''. 

हे ही वाचा : नांदेड : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने वसतीगृहातच गळफास घेत जीवन संपवलं, प्रकरण राष्ट्रवादीच्या नेत्याशी कनेक्टेड

पोलिसांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्या होत्या. नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.  एसीपी म्हणाले की, शवविच्छेदन अहवालात असे दिसून आले की, राठोडच्या कंबरेवर, तसेच शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्या होत्या. संबंधित प्रकरणात इतर रुग्णांची सखोल चौकशी केली. औषध घेण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने राठोडशी वाद घातला होता.  त्यांनी काठीने मारहाण देखील केली. पोलिसांनी जिग्नेश देसाई, रोहन संघानी. शैलेश वाघेला आणि दिलीप जोशी यांना अटक केली आणि त्यांच्यावर खून आणि इतर गुन्ह्यांचा आरोप करण्यात आला. 

    follow whatsapp