'अहो, मला भजी खायची आहेत..', नवऱ्याला कॅन्टीनमध्ये पाठवलं, अन् नवविवाहिता इमरानसोबत पळून गेली!

Crime News : रिमझिम बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच पीतमची शुद्ध हरपली. त्याने परिसरात तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तिचा मोबाईल फोनही बंद येत होता. सुरुवातीला तिला काही धोका तर झाला नाही ना, या भीतीने तो व्याकुळ झाला होता. मात्र, बस स्थानकावरील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ती फोनवर कोणाशी तरी बोलत खाली उतरली आणि लगबगीने निघून गेली.

Crime News

Crime News

मुंबई तक

13 Mar 2026 (अपडेटेड: 13 Mar 2026, 10:05 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'अहो, मला भजी खायची आहेत..', नवऱ्याला कॅन्टीनमध्ये पाठवलं

point

अन् नवविवाहिता इमरानसोबत पळून गेली!

Crime News : एका नवविवाहितेने आपल्या पतीला अत्यंत चलाखीने चकवा देत भररस्त्यातून पलायन केले. ही घटना 9 मार्च 2026 रोजी दुपारी 2 च्या सुमारास बिलारी रोडवेज बस स्थानकावर घडली.  पीतम सिंह हा आपली पत्नी रिमझिम हिला तिच्या माहेरून म्हणजेच रामपूरहून रिसिव्ह करून आपल्या घरी घेऊन जात होता. माहेरी सण साजरा केल्यानंतर रिमझिम पतीसोबत बसने प्रवास करत होती. मात्र, या आनंदाच्या प्रवासाचे रूपांतर काही वेळातच कायदेशीर गुंतागुंतीत होईल, याची पुसटशी कल्पनाही पीतमला नव्हती. प्रवासादरम्यान बस बिलारी स्थानकावर थांबली असता, रिमझिमने पतीकडे भजी खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याला कॅन्टीनमध्ये पाठवले. आपल्या पत्नीची हौस पुरवण्यासाठी पीतम आनंदाने खाली उतरला, पण जेव्हा तो हातात भजी घेऊन परतला, तेव्हा त्याची पत्नी जागेवर नव्हती. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातून ही घटना समोर आली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : पुणे : एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर कोयत्याने वार, हल्ल्यानंतर आरोपीने आत्महत्या करत संपवले जीवन

नियोजित कट आणि संशयाची सुई

रिमझिम बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच पीतमची शुद्ध हरपली. त्याने परिसरात तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तिचा मोबाईल फोनही बंद येत होता. सुरुवातीला तिला काही धोका तर झाला नाही ना, या भीतीने तो व्याकुळ झाला होता. मात्र, बस स्थानकावरील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ती फोनवर कोणाशी तरी बोलत खाली उतरली आणि लगबगीने निघून गेली. पीतमने दिलेल्या तक्रारीनुसार, रिमझिमचे लग्न 1 डिसेंबर 2025 रोजी झाले होते, परंतु तिचे लग्नापूर्वीच इमरान नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. हा सर्व प्रकार केवळ पळून जाण्यासाठी रचलेला एक बनाव होता, असे आता स्पष्ट झाले आहे. पतीला भजी आणि पाणी आणण्याच्या बहाण्याने दूर पाठवणे, हा त्या कटाचाच एक भाग होता जेणेकरून गर्दीचा फायदा घेऊन ती आपल्या प्रियकरासोबत पसार होऊ शकेल. पीतमने याप्रकरणी ग्राम सागरपूर येथील इमरान या तरुणावर गंभीर आरोप करत पोलिसांत धाव घेतली आहे.

हेही वाचा : सासूने सुनेला रात्री 1 वाजता प्रियकरासोबत रेड हँड 'नको त्या' अवस्थेत पकडलं, अन् अर्धा तासात...

पोलीस तपास आणि सीसीटीव्ही फुटेजचा आधार

पीतम सिंहच्या तक्रारीनंतर बिलारी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीने बेपत्ता झाल्याची नोंद करून तपास उपनिरीक्षक विनीत कुमार यांच्याकडे सोपवला आहे. तपासादरम्यान पोलीस आता बस स्थानकावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज खंगाळत आहेत. रिमझिम आणि इमरान यांच्यातील संपर्काची खातरजमा करण्यासाठी त्यांच्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) तपासले जात आहेत. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दोघांचे लोकेशन ट्रॅक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ठिकाणांवर छापे टाकले जात असून लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल. पत्नीच्या या कृत्यामुळे पीतम पूर्णपणे खचला असून, लग्नानंतरच्या पहिल्याच मोठ्या सणानंतर असा धक्का बसेल असे त्याला वाटले नव्हते.

कुटुंबीयांना धक्का आणि गावभर चर्चा 

या घटनेमुळे केवळ पीतमच नव्हे, तर त्याचे संपूर्ण कुटुंब हादरले आहे. पीतमच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, सून अशा प्रकारचे पाऊल उचलेल याची त्यांना साधी भनकही लागली नव्हती. ज्या सुनेचे स्वागत घरात मोठ्या उत्साहात केले होते, तिनेच घराची अब्रू वेशीवर टांगली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ही घटना सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, सोशल मीडियावरही या 'फिल्मी' पलायनाची चर्चा रंगली आहे. लग्नासारख्या पवित्र बंधनाचा उपयोग केवळ स्वार्थासाठी आणि अशा प्रकारे फसवणूक करण्यासाठी केल्याबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आता सर्वांचे लक्ष पोलीस तपासाकडे लागले असून, रिमझिम आणि तिचा प्रियकर इमरान कधी सापडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबईच्या डॉक्टर स्तुती सोनावणेनं बॉयफ्रेंड फैजुलमुळे संपवलं आयुष्य, 'त्या' चिठ्ठीत हादरवून टाकणारा खुलासा
 

    follow whatsapp