Crime News: उत्तराखंडच्या हरिद्वारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या मित्राची निर्घृणपणे हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आरोपी तरुणाने त्याच्या मित्राचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्याची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असल्याची माहिती आहे. संबंधित घटना हरिद्वार जिल्ह्यातील सिडकुल पोलीस स्टेशन हद्दीतील रावली महदूद गावात घडल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
दोघे एकाच फॅक्टरीमध्ये काम करत होते...
मृताचं नाव ललित असं असून त्याची हत्या करणाऱ्या त्याच्या मित्राचं नाव धर्मेंद्र (42) असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपी तरुण उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील स्योहारा पोलीस स्टेशन परिसरातील नौगांव येथील रहिवासी आहे. घटनेत मृत पावलेला तरुण सुद्धा याच गावाचा रहिवासी असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, धर्मेंद्र आणि ललित दोघे सिडकुल येथील एका फॅक्टरीमध्ये काम करत होते. जवळपास तीन वर्षे दोघे एकत्रच काम करत होते.
20 दिवसांपूर्वी घर भाड्याने...
20 दिवसांपूर्वीच दोन्ही तरुणांनी रावली महमूद येथे भाड्याने घर घेतलं होतं. हत्येची ही घटना शुक्रवारी (29 ऑगस्ट) घडल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घराच्या मालकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घरमालकाने त्याच्या घरात तरुणाची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलीस आता या घटनेचा तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: देशात सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? 'या' मुख्यमंत्र्याला मिळाली सर्वाधिक पसंती, MOTN सर्व्हे वाचा एकदा
संबंधित प्रकरणाच्या तपासात धर्मेंद्रने त्याचा मित्र ललितची हत्या केल्याचं समोर आलं. खरंतर, धर्मेंद्रला बऱ्याच काळापासून ललित आणि आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय होता. चार दिवसांपूर्वीच आरोपी धर्मेंद्रची पत्नी तिच्या गावी गेली होती. त्यावेळी ललितसुद्धा तिच्यासोबत गेला होता. यामुळे धर्मेंद्रचा संशय आणखी वाढला.
हे ही वाचा: Personal Finance: 'मला माझ्या आजी-आजोबांनी दिलेले दागिने विकायचे आहेत, किती कर भरावा लागेल?', पाहा काय आहे नेमका कायदा
निर्घृणपणे केली मित्राचीच हत्या
मध्यरात्री सुमारे 2:30 वाजता धर्मेंद्र आणि ललित एकत्र झोपले असताना धर्मेंद्रने त्याच्या मित्राच्या डोक्यावर हातोडीने वार केले. इतकेच नव्हे, तर त्याने ओढनीने ललितचा गळा दाबून त्याची हत्या केली. पोलिसांच्या चौकशीत आरोपी तरुणाने केलेल्या कृत्याबद्दल त्याला कोणत्याही प्रकारचा पश्चात्ताप होत नसल्याचं सांगितलं. हत्येत वापरण्यात आलेली हातोडी आणि कापड पोलिसांनी जप्त केलं असून संबंधित आरोपीला ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
