पती-पत्नीचा टीव्हीच्या आवाजावरून वाद, बायकोची सटकताच चाकूने वार करत नवऱ्याला संपवलं

crime news : पती-पत्नीचा टीव्हीच्या आवाजावरून वाद झाला, याच वादातून महिलेनं पतीची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, टीव्हीच्या आवाजावरून झालेल्या वादातूनच पत्नीने पतीवर चाकूने वार करत संपवलं.

crime news

crime news

मुंबई तक

• 07:00 AM • 25 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पती-पत्नीचा टीव्हीच्या आवाजावरून वाद

point

बायकोनं पतीवर चाकूने हल्ला करत संपवलं

Crime News : आंध्र प्रदेशातील मंगलागिरीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पती-पत्नीचा टीव्हीच्या आवाजावरून वाद झाला, याच वादातून महिलेनं पतीची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, टीव्हीच्या आवाजावरून झालेल्या वादातूनच पत्नीने पतीवर चाकूने वार करत संपवलं. मृत व्यक्तीचे नाव शेख अहमद (वय 27) असे आहे. शेख अहमद हा एसी मेकॅनिकचं काम करतो. अहमद आणि त्याची पत्नी मंगलागिरी येथील टिडको हाऊसिंग कॉलनीत राहत होते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सून आणि तिच्या प्रियकराचं सासऱ्याने घडवून आणलं मिलन, पण नंतर केली 'डर्टी डिमांड' अन्...

पती-पत्नीचा टीव्हीच्या आवाजावरून वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेनं आपल्या पत्नीला टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितले, तेव्हा त्यांच्यात मोठा वाद उफळला होता. संतापलेल्या महिलेनं पतीवर चाकूने हल्ला करत संपवलं. या प्रकरणात काही नागरिकांनी अहमदला विजयवाडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. 

हे ही वाचा : चंद्रपूर : कारल्याची भाजी बनवल्याचा लेकाला राग, नंतर आईचीच केली निर्घृणपणे हत्या

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, महिलेला अटक करण्यात आली. प्राथमिक तपासातून समोर आले, हे प्रकरण घरगुती वादाशी संबंधित असल्याचे दिसून येत आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व पैलूंचा तपास करत आहेत. 

    follow whatsapp