तरुणाने लग्नास दिला नकार, स्कार्फने गळफास घेत तरुणीने संपवलं जीवन

Crime News : प्रियकराने विवाह करण्यास नकार दिल्यानं तरुणीने स्कार्फने गळफास घेत जीवन संपवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. दरम्यान, संबंधित तरुणीचा मृतेदह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 09:00 AM • 25 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणाचा विवाहास नकार, तरुणीनं संपवलं जीवन

point

तरुणीचा मृतदेह फासावर लटकलेल्या स्वरुपात आढळला

Crime News : प्रियकराने विवाह करण्यास नकार दिल्यानं तरुणीने स्कार्फने गळफास घेत जीवन संपवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. दरम्यान, संबंधित तरुणीचा मृतेदह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. ही घटना उत्तर प्रदेशातील सदर बाजार पोलीस स्टेशन परिसरातील हकीकत नगर कॉलनी येथे घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा :  मुलाचं लग्न तोंडावर असताना 37 वर्षीय मामी 21 वर्षीय भाच्यासोबत गेली पळून, नवरा आठवणीत झाला वेडा

तरुणाचा विवाहास नकार, तरुणीनं संपवलं जीवन

या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, महिलेचे तरुणाशी प्रेमसंबंध होते. संबंधित तरुणीला त्याच्याशी विवाह करायचा होता, पण त्याने विवाहास नकार दिल्याने प्रेयसीने स्कार्फने गळफास घेत जीवन संपवलं. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. मृत मुलीचे नाव पारूल उर्फ टीना असे होते.

तरुणीचा मृतदेह फासावर लटकलेल्या स्वरुपात आढळला

पारूल ही सांगीताच्या घरी 10 महिन्यांपासून घरकाम करत होती. ती संगीताच्याच घरी राहू लागली होती. रविवारी ती खोलीतून बाहेरच पडली नाही, तेव्हा खिडकीतून पाहिल्यावर तिचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेनंतर घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती. 

हे ही वाचा :  अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट, देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी दिली माहिती

या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली, पोलिसांनी  बंद दरवाजा तोडून मृतदेह खाली आणला. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाचा तपास करून पुरावे गोळा केले. प्राथमिक पोलीस तपासातून हे प्रेमप्रकरण उघडकीस आले. महिलेला प्रियकराशी लग्न करायचे होते, परंतु त्याने नकार दिला असता, त्या तरुणी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती. संबंधित प्रकरणात कुटुंबाने कोणतीही लेखी तक्रार दिली नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.  

    follow whatsapp