दर्शनाला आलेल्या महिलेकडे सेक्सची मागणी, मलकापूरच्या लोमटे महाराजाला अटक

दैवी चमत्काराचे दावे करणारे कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ सुभाष लोमटे (Eknath Lomte Maharaj) महाराजला येरमाळा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर लोमटे महाराजवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

eknath lomte maharaj arrested for abusing a women osmanabad dharashiv

eknath lomte maharaj arrested for abusing a women osmanabad dharashiv

प्रशांत गोमाणे

• 02:15 PM • 16 Aug 2023

follow google news

दैवी चमत्काराचे दावे करणारे कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ सुभाष लोमटे (Eknath Lomte Maharaj) महाराजला येरमाळा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर लोमटे महाराजवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. लोमटे महाराजाविरूद्ध दर्शनाला येणाऱ्या महिला भाविकेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यानंतर त्यांना अटक होऊन जामिन मंजूर झाला होता.या जामिनानंतर पीडित महिलेने पुन्हा न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर आज न्यायालयाच्या आदेशानंतर लोमटे महाराजवर अटकेची कारवाई करण्यात आली. (eknath lomte maharaj arrested for abusing a women osmanabad dharashiv)

हे वाचलं का?

प्रकरण काय?

दैवी चमत्कारासाठी प्रसिद्ध असणारे लोमटे महाराज (Eknath Lomte Maharaj) राज्यभर प्रसिद्ध आहेत. महाराजाचे दर्शन घेण्यासाठी दुर दुरवरून भक्त येत असतात. अशीच एक महिला भक्त परळीहून लोमटे महाराजाचे दर्शन घेण्यासाठी आली होती. 28 जुलै 2022 रोजी ही महिला लोमटे महाराजच्या मठात आली. यावेळेस दुपारच्या सुमारास लोमटे महाराजाने महिलेला खोलीत बोलावून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. मात्र महिलेने यास नकार दिला. तरीही महाराज मानला नाही, आणि तुझ्या बरोबरचे शरीर संबंधाचे व्हिडिओ माझ्याकडे असल्याची धमकी देत तिचा विनयभंग केला. या घटनेनतर मंदिर परिसरात एकच खळबळ माजली होती. या घटनेनंतर लोमटे महाराज फरार झाला होता.

हे ही वाचा : Mumbai train firing : बुरखाधारी महिलेला म्हणायला लावलं ‘जय माता दी’, CCTV त कैद

दरम्यान या प्रकरणी रात्री 1 वाजता महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर महाराजवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर लोमटे महाराजला अटकही झाली होती. मात्र जामिनावर त्याची सुटका झाली. या प्रकरणी महिलेने पुन्हा न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आज येरमाळा पोलिसांनी सापळा रचून एकनाथ सुभाष लोमटे महाराजला अटक केली आहे.

एकनाथ लोमटे महाराजांच्या अटकेनंतर धार्मिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी महाराजाला ताब्यात घेतल्यानंतर कसून तपास सूरू केला आहे. या चौकशीत काय खुलासे होतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान लोमटे महाराजवर याआधी जादुटोणा आणि लोकांची फसवणूक केल्याचेही गुन्हे दाखल आहेत.

हे ही वाचा : Crime: गुप्त फोन, प्रियकर अन्… जमिनीत पुरलेला मृतदेह काढला बाहेर; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

 

    follow whatsapp