पन्नासपर्यंत आकडे न लिहिला आल्याने चार वर्षाच्या मुलीला केलं ठार; संतापलेल्या बापाचं कृत्य, रिमान्डमध्ये घेताच दिली कबुली

Father Kills daughter over homework : पोटची मुलं ही आई-वडिलांसाठी जीव की प्राण असतात. मात्र अशा काही घटना घडतात की या नात्याला काळिमा फासला जातो. अशीच एक भयानक घटना समोर आली आहे. मुलीने होमवर्क करताना केलेल्या चुकांमुळे रागावलेल्या एका बापाने त्या मुलीला इतकं मारलं की यामध्ये त्या चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

Farher Kills daughter over homework

Farher Kills daughter over homework

मुंबई तक

24 Jan 2026 (अपडेटेड: 24 Jan 2026, 01:43 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पन्नासपर्यंत आकडे न लिहिला आल्याने मुलीला केलं ठार

point

संतापलेल्या बापाचं कृत्य

point

रिमान्डमध्ये घेताच दिली कबुली

Father Kills daughter over homework : पोटची मुलं ही आई-वडिलांसाठी जीव की प्राण असतात. मात्र अशा काही घटना घडतात की या नात्याला काळिमा फासला जातो. अशीच एक भयानक घटना समोर आली आहे. मुलीने होमवर्क करताना केलेल्या चुकांमुळे रागावलेल्या एका बापाने त्या मुलीला इतकं मारलं की यामध्ये त्या चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. चिमुकलीच्या आईनेच याविषयी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर त्या नराधम बापाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Dhoom फेम अभिनेत्रीचं रुपडं पालटलं, चाहत्यांना ओळखताही येईना,पाहा व्हिडीओ; आता दुबईत करते ‘हा’ व्यवसाय

पन्नासपर्यंत आकडे लिहिता न आल्याचा राग

हरियाणाच्या फरिदाबादमधील 21 जानेवारीची ही घटना असून कृष्णा जैस्वाल असं या 31 वर्षीय नराधम बापाचं नाव आहे. त्याने आपल्या चार वर्षांच्या चिमुकलीला पन्नासपर्यंतचे आकडे लिहिण्यास सांगितले. मात्र ते लिहिणं मुलीला जमलं नाही. यामुळे कृष्णाला राग आला आणि त्याने मुलीला मारलं. हा मार इतका भयानक होता की यामध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला. यावेळी त्या मुलीची आई घरात उपस्थित नसल्याने नराधम बापाला रोखणारं कोणीही नव्हतं. दरम्यान,  या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जैस्वाल कुटुंब मूळ उत्तरप्रदेशातील सोनभद्रा जिल्ह्यातील असून ते फरिदाबाद इथं भाड्याच्या घरात राहतात.

कामावरुन घरी परतल्यानंतर आईला काय दिसलं?

चिमुकलीची आई सायंकाळी कामावरुन घरी परतल्यानंतर तिला धक्काच बसला. घरात तिला आपली मुलगी दिसली, मात्र त्या मुलीच्या शरीरात प्राण नव्हते. यानंतर लगेचच तिने पोलिसांना फोन केला. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ते चिमुकले प्राणहिन शरीर आपल्या ताब्यात घेतले.

हे ही वाचा :  शाळकरी मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवलं अन् स्कूल व्हॅनमध्येच चालकाचा 14 वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्कार...

पोलिस तपास काय सांगतो?

फरिदाबाद पोलिसांनी नराधम बापाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केल्यानंतर मुलीला मारण्याचे कारण त्याने सांगितले. मुलीचे आईवडील एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. आई कामाला गेल्यानंतर तिचे वडील तिची काळजी घेण्यासाठी घरी थांबल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'आरोपीविरोधात केस दाखल करण्यात आली असून पुढील चौकशीसाठी आरोपीला रिमान्डमध्ये घेण्यात आलं आहे. मुलीचे पोस्टमार्टम करुन तिचे शरीर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

    follow whatsapp