Crime News : पवित्र बौद्ध लेण्यांमध्ये राहणाऱ्या एका 80 वर्षीय वृद्ध बौद्ध भिक्षुणीची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. 2 मार्च रोजी ही हत्या झाली होती. लूटमार करण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ADVERTISEMENT
मृत महिला ही मूळ तिबेटी वंशाची असून तिच्या घरी दूध द्यायला येणाऱ्या व्यक्तीनेच त्याच्या साथीदारांसोबत मिळून ही हत्या केली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सरकीधार य्थील पवित्र लेण्यामध्ये ही वृद्ध महिला रहायची. मन:शांती आणि आयुष्याचा खरा अर्थ उमगावा यासाठी अनेकजण या लेण्यांना भेट देतात. काहीजण तिथं राहतातसुद्धा.
चारपेक्षा अधिक पुरुषांचे डीएनए
या प्रकरणाच्या तपासात फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या अहवालाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. मृतदेहावरून मिळालेल्या नमुन्यांमध्ये चारपेक्षा अधिक पुरुषांचे डीएनए आढळल्याने, ही हत्या एका व्यक्तीने नसून एका टोळीने केल्याचे स्पष्ट झाले. या धक्कादायक खुलाशानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली असून, अटक करण्यात आलेल्या सर्व चार आरोपींचे डीएनए नमुने आता पुढील तपासासाठी घेण्यात आले आहेत.
हे ही वाचा : अवैध प्रेमसंबंधाला नवऱ्याचा विरोध, बायकोने पतीचे गुप्तांग छाटलं, हादरवून टाकणारा घटनेचा थरार
आधी नशा केली अन् नंतर हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी गगन बौद्ध याला भिक्षुणीच्या दिनचर्येबद्दल सविस्तर माहिती होती. घटनेच्या रात्री 2 मार्च रोजी, आरोपींनी घटनास्थळापासून काही अंतरावर नशा केली आणि रात्री 9 च्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला करून भिक्षुणीची हत्या केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून वाचण्यासाठी आरोपींनी मुख्य रस्त्यांऐवजी ग्रामीण भागातील पळवाटांचा वापर केला होता. या प्रकरणात गुरुवारी (2 मार्च) रात्री तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, बल्ह खोऱ्यातील एका अल्पवयीन मुलाचाही यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अल्पवयीन मुलाच्या घरात सापडला मोबाईल
या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेऊन जुवेनाइल जस्टिस बोर्डासमोर हजर केले, तिथून त्याला ऊना येथील बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या मुलाच्या घरातूनच पोलिसांनी हत्याकांडासाठी वापरलेला चाकू आणि मृत महिलेचा 'ॲपल' कंपनीचा मोबाईल फोन जप्त केला आहे. आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी भिक्षुणीच्या पतीचा मोबाईल चंदीगडमध्ये विकला होता, ज्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक चंदीगडला रवाना झाले आहे. तसेच, गगन शर्मा याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मोबाईलमधील महत्त्वाचे संपर्क क्रमांकही मिटवले होते.
हे ही वाचा : अशोक खरातचा मुलगा पळाला, मोबाईल बंद असल्याने SIT कडून शोध सुरु; नेमकं काय घडलं?
पोलिसांनी काय सांगितले?
मंडीचे पोलीस अधीक्षक विनोद कुमार यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहेत. आरोपींनी पुरावे मिटवण्याचा कितीही प्रयत्न केला असला, तरी तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे पोलीस ठोस साखळी तयार करत आहेत. चंदीगडमध्ये ज्या व्यक्तीने चोरीचा फोन विकत घेतला आणि त्यात नवीन सिम सक्रिय केले, त्याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणातील सर्व पैलूंची बारकाईने चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत.
ADVERTISEMENT











