बायकोने कापून टाकले नवऱ्याचे गुप्तांग, बॉयफ्रेंडला भेटण्यापासून रोखल्याने संतापली; नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

• 12:36 PM • 05 Apr 2026

नवऱ्याने बायकोला तिच्या प्रियकरासोबत बघणे चांगलेच महागात पडले. यानंतर बायकोने प्रियकरासोबत व्यवस्थित प्लॅनिंग करुन नवऱ्याचे गुप्तांगाच कापून टाकले आहे. यानंतर पुढे पीडित नवऱ्यासोबत काय घडलं, जाणून घ्या सविस्तर.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बायकोने कापून टाकले नवऱ्याचे गुप्तांग

point

बॉयफ्रेंडला भेटण्यापासून रोखल्याने संतापली

point

नेमकं प्रकरण काय?

Crime News : अनैतिक संबंधातून होणाऱ्या हत्यांमध्ये सातत्याने वाढ होताना पहायला मिळत आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र या घटनेत नवऱ्याचा जीव जाता-जाता राहिला. मात्र त्याच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर इजा झाली आहे. त्याचं झालं असं की, पीडित पतीच्या पत्नीचे एका परपुरुषासोबत अनैतिक संबंध होते. याची कुणकुण पतीला लागली होती. एके दिवशी त्याने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत बघितले. यानंतर पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीचे गुप्तांगच कापून काढले आहे. नेमकी घटना काय आहे, सविस्तर जाणून घेऊया.

हे वाचलं का?

बायकोचे टिंकूसोबत अफेयर

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे निलेश आणि विनिता हे दोघे नवरा-बायको एका भाड्याच्या घरात राहतात. निलेश हा एका चपलांच्या कारखान्यात काम करतो. दोघांचं सगळं सुरळीत चालू असताना विनिताचे टिंकू नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमप्रकरण जुळले. नवरा कामावर गेला की विनिता टिंकूला बोलावून घेत असे.

पत्नीला प्रियकराला भेटण्यापासून रोखले

विनिताच्या या प्रकरणाची तिच्या पतीला म्हणजे निलेशला कुणकुण लागली. एके दिवशी त्याने विनिताला टिंकूसोबत पकडले. यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला. त्याने विनिताला टिंकूला भेटण्यापासून रोखले. मात्र विनिता काही ऐकणाऱ्यातील नव्हती. तिने टिंकू आणि घर मालकासोबत मिळून एक प्लॅन बनवला आणि निलेशला धडा शिकवायचे ठरवले.

हे ही वाचा : रील करण्याच्या बहाण्याने गर्लफ्रेंडचे दोन्ही हात मागे बांधले, अन् थंड डोक्याने थेट गळा चिरुन टाकला, नेमकं कारण काय?

बायकोने केले गुप्तांगावर वार

केलेल्या नियोजनानुसार, विनिता, टिंकू आणि घरमालक या तिघांनी मिळून गुरुवारी  रात्री 11 वाजता निलेशला कामावरुन घरी परतत असताना एकट्यात गाठले. त्याला दमदाटी करत त्याच्या गुप्तांगावर चाकूने वार केले आणि पसार झाले. या हल्ल्यामुळे निलेशच्या गुप्तांगाला गंभीर जखम झाली.

हे ही वाचा : विधवा शिक्षिकेवर शिक्षकाने केला बलात्कार, आक्षेपार्ह फोटो काढून उकळले लाखो रुपये; आरोपी शिक्षक फरार

पोलिस काय म्हणतात?

यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या निलेशला रुग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी निलेशने त्याच्या बायको विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले की, निलेशच्या गुप्तांगावर झालेल्या हल्ल्यामुळे त्याला धक्का बसला आहे. तो सध्या कुठे राहतो ही माहितीदेखील त्याला नीट देता येत नाहीये. पोलिस आता निलेशच्या बरं होण्याची वाट पहात आहेत.