अवैध प्रेमसंबंधाला नवऱ्याचा विरोध, बायकोने पतीचे गुप्तांग छाटलं, हादरवून टाकणारा घटनेचा थरार

मुंबई तक

crime news : अवैध प्रेमसंबंधाला विरोध केल्याने पत्नीने तिच्या प्रियकर आणि घरमालकासोबत मिळून पतीवर प्राणघातक हल्ला केला. तिघांनी मिळून संबंधित पतीच्या गुप्तांगावर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या पतीवर एसएन एमर्जन्सीमध्ये उपचार सुरु करण्यात आले.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकर टिंकू आणि घरमालकाने मिळून पुरुषाच्या गुप्तांगावर केले वार 

point

हादरवून टाकणारा घटनेचा थरार

Crime News : अवैध प्रेमसंबंधाला विरोध केल्याने पत्नीने तिच्या प्रियकर आणि घरमालकासोबत मिळून पतीवर प्राणघातक हल्ला केला. तिघांनी मिळून संबंधित पतीच्या गुप्तांगावर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या पतीवर एसएन एमर्जन्सीमध्ये उपचार सुरु करण्यात आले. पीडित व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे, सिकंदरा पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आहे.

हे ही वाचा :  बायकोने कापून टाकले नवऱ्याचे गुप्तांग, बॉयफ्रेंडला भेटण्यापासून रोखल्याने संतापली; नेमकं प्रकरण काय?

घडलेल्या घटनेनुसार, एटा येथील साकियात पोलीस ठाणे परिसरात मुबारकपूर गावचा रहिवासी असलेला निलेश, सितंदरा परिसरात एका बुटाच्या कारखान्यात नोकरी करतो. तो आणि पत्नी हिरालालल हे विहिरीजवळील एका खोलीत भाडेतत्वावर राहत होते. 

प्रियकर टिंकू आणि घरमालकाने मिळून पुरुषाच्या गुप्तांगावर केले वार 

या प्रकरणी सिकंदरा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं की, पीडितेनं म्हटलं की, गुरुवारी रात्री 11 वाजता त्याची पत्नी वनिता, तिचा प्रियकर टिंकू आणि घरमालक यांनी मिळून त्याच्या घराशेजारी हल्ला केला. तिघांनी मिळून त्यांच्या गुप्तांगावर चाकूने वार केले, ज्यात नवरा गंभीररित्या जखमी झाला होता. 

हे ही वाचा :  बुध ग्रहाच्या मीन राशीतील प्रवेशामुळे विशेष योग निर्माण होणार, 'या' राशीतील लोकांचे उजळणार नशीब

आरोपी रक्तात माखलेल्या अवस्थेत असताना घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी जखमी व्यक्तीला एसएन आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. नंतर डॉक्टरांनी त्याला धोक्याबाहेर असल्याचे सांगितले. अशातच पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. संबंधित प्रकरणाची माहिती लवकरच समोर येण्याची अधिक शक्यता आहे. 
 

हे वाचलं का?