कौशांबी (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील कौशांबीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या पतीवर अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. पत्नीने असा आरोप केला आहे की, तिच्या पतीने तिचे आणि तिच्या बहिणीचे.. म्हणजेच पत्नी आणि मेव्हणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
ADVERTISEMENT
पीडित पत्नीचे म्हणणे आहे की, पतीने दारूच्या नशेत हे कृत्य केले आहे. त्याने तिचा आणि तिच्या बहिणीचा अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. ज्या प्रकरणी आता पत्नीने आरोपी पतीविरुद्ध पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पीडितेचे म्हणणे आहे की, पतीची माझ्या बहिणीवर वाईट नजर होती आणि त्याने तिची छेडछाड करण्याचा देखील प्रयत्न केला होता.
हे ही वाचा>> बेवफा गर्लफ्रेंड! तरुणीने दुसऱ्यासोबत ठेवले लैंगिक संबंध, पहिल्या बॉयफ्रेंडल समजलं.. मग सगळा राडाच!
पतीने नातेसंबंधाला लावला कलंक
कौशांबीच्या सैनी पोलीस स्टेशन परिसरातून हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे. येथे एका महिलेने स्वतःच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेचे म्हणणे आहे की, लग्नाच्या काही महिन्यांनंतर तिच्या पतीने दारू पिऊन तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच तिच्या सासरकडील मंडळींनी देखील तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा>> पुणे: कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट, तरुणीच्या कॉलेजमधील महिला टिचरनेच...
पीडित महिलेचे म्हणणे आहे की, तिच्या पतीने प्रथम तिच्यासोबत अश्लील कृत्य केले आणि नंतर तिच्या बहिणीला म्हणजेच त्याच्या मेव्हणीलाही सोडले नाही. त्याने दोन्ही बहिणींचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे तिचे संपूर्ण कुटुंब मानसिक तणावाखाली आहे. महिलेने या प्रकरणी डीजीपीकडे तक्रार केली, त्यानंतर आयटी कायदा आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी काय दिली माहिती?
या संपूर्ण प्रकरणाबाबत एएसपी राजेश सिंह म्हणाले की, डीजीपीच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने तिच्या पतीवर अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
ADVERTISEMENT
