आजीच्या कुशीत झोपलेली नातवंडं अचानक ओरडू लागली, गावकऱ्यांनी बघितलं अन् सगळेच हादरले, आजोबांनी...

एका मद्यधुंद पतीने क्षुल्लक घरगुती वादातून आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने हे क्रूर कृत्य आपल्या दोन निष्पाप नातवांसमोर केले आणि त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला.

CRIME NEWS

CRIME NEWS

मुंबई तक

• 08:11 AM • 11 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

आजीच्या कुशीत झोपलेली नातवंडं अचानक ओरडू लागली

point

गावकऱ्यांनी बघितलं अन् सगळेच हादरले

point

आजोबांनी...

Crime News : झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मेहरमा ब्लॉकच्या सुरनी पंचायतीमधील घासीचक गावात शुक्रवारी (8 मे) एका मद्यधुंद पतीने क्षुल्लक घरगुती वादातून आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने हे क्रूर कृत्य आपल्या दोन निष्पाप नातवांसमोर केले आणि त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला.

हे वाचलं का?

तोंडात कापड कोंबून कुऱ्हाडीने केले वार

मिळालेल्या माहितीनुसार, 60 वर्षीय किशन दास याला दारूचे व्यसन होते. शुक्रवारी नशेत असताना त्याचे 55 वर्षीय पत्नी रुबी देवी यांच्याशी काही कारणावरून भांडण झाले. या वादानंतर रात्री रुबी देवी आपल्या लव आणि कुश या दोन नातवांसह झोपल्या होत्या. त्याच वेळी संतापलेल्या किशन दासने झोपलेल्या पत्नीच्या तोंडात कापड कोंबले, जेणेकरून ती ओरडू शकणार नाही आणि घरातील कुऱ्हाडीने तिच्यावर सपासप वार करून तिची हत्या केली.

हे ही वाचा : पोलीस कोणी नसताना सहकाऱ्याच्या घरी जायचा, 8 वर्षांनी मोठं कांड, आईने सगळंच सांगितलं

नातवंडं भीतीने ओरडू लागली अन्..

या थरारक घटनेदरम्यान खोलीत हजर असलेले चिमुकले लव आणि कुश भीतीने ओरडत होते. त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून जेव्हा ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले, तोपर्यंत आरोपी किशन दास तेथून पळून गेला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रुबी देवी यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सदर रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा : बिझनेसमन, मुलगा अन् मुलगी... सिमेंट फॅक्टरीत सापडले तीन मृतदेह; नेमकं काय घडलं?

'आमच्या डोळ्यांदेखत आजीला मारले'

घटनेची माहिती मिळताच मेहरमा पोलीस ठाण्याचे प्रभारी सौरभ कुमार ठाकूर पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवला असून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासात मुलांचे जबाब नोंदवले, ज्यामध्ये त्यांनी 'आजोबांनी आमच्या डोळ्यांदेखत आजीला मारले' असे सांगितले. आरोपी किशन दास विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्याच्या अटकेसाठी ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत.