कोर्ट मॅरेज केले अन् तीनच महिन्यात झाली हत्या, 22 वर्षीय मोनिकासोबत काय घडलं?

तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या मोनिका डागरचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला आहे. मोनिकाच्या आईने जावयावर संशय व्यक्त केला आहे. प्रॉपर्टीसाठी तिची हत्या झाल्याचे बोलले जात आहे.

crime news

crime news

मुंबई तक

• 07:11 AM • 11 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोर्ट मॅरेज केले अन् तीनच महिन्यात झाली हत्या

point

22 वर्षीय मोनिकासोबत काय घडलं?

Crime News : ग्रेटर नोएडा परिसरात 22 वर्षीय विवाहिता मोनिका नागर हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मोनिकाची हत्या झाल्याचा गंभीर आरोप तिच्या नातेवाईकांनी केला असून, तिचे लग्न अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच झाले होते. कोट्यवधींच्या मालमत्तेच्या हव्यासापोटी आपल्या मुलीचा बळी घेतल्याचा दावा मृत मुलीच्या आईने केला आहे. आरोपी तरुणाने आधी मोनिकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी कोर्ट मॅरेज केले आणि त्यानंतर तो सतत मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता, असा आरोप त्यांनी केला आहे.

हे वाचलं का?

आईला पाहताच आरोपी फरार

घडलेल्या घटनेनुसार, गुरुवारी (7 मे) संध्याकाळी मोनिकाने आपल्या आईला फोन करून सासरची मंडळी तिला मारहाण करत असल्याचे सांगितले होते. ही माहिती मिळताच जेव्हा आई घरी पोहोचली, तेव्हा घराबाहेर मोठी गर्दी जमली होती. त्यांनी आपल्या मुलीला आरोपी पतीच्या कारमध्ये मृतावस्थेत पाहिले आणि त्यांना पाहताच आरोपी तिथून फरार झाला, असा आरोप आहे. त्यानंतर मोनिकाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला जळालेल्या अवस्थेत आढळून आला. या वेदनादायक घटनेमुळे संतापलेल्या नातेवाईकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची मागणी करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा : कानात स्क्रू ड्रायव्हर, डोळे काढले आणि हात पाय छाटले; नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला संपवल्याचा आरोप

अनुजशी केले होते कोर्ट मॅरेज

दुसरीकडे, दादरी पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, मोनिका तिच्या आईसोबत एका भाड्याच्या घरात राहत होती आणि काही काळापूर्वी तिने घोडी बछेडा येथील रहिवासी अनुज चौहान याच्याशी कोर्ट मॅरेज केले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नंतर दोन्ही कुटुंबांनी या लग्नाला संमती दिली होती, परंतु लग्नानंतर युवती आणि अनुज यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून सतत वाद होत होते. 

हे ही वाचा : पीएम मोदी पाया पडले अन् आनंदाने मिठीही मारली, माखनलाल सरकार आहेत तरी कोण?

मारहाणीची भावाला माहिती

7 मे रोजी तरुणीने आपल्या भावाला फोन करून मारहाणीची माहिती दिली होती, त्यानंतर नातेवाईक तिथे पोहोचले असता त्यांना मोनिकाच्या हत्येची माहिती मिळाली. पोलिसांनी नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, आरोपींच्या शोधासाठी पथक तयार केले आहे, जेणेकरून लवकरात लवकर अटक करता येईल.