Crime News : उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलींची हत्या केली. नंतर त्यांचे मृतदेह 9 फुट खड्डा खाणून घरातच पुरण्यात आले. घडलेल्या घटनेनुसार, पत्नी बुरखा परिधान न करताच माहेरी गेल्याने तो व्यक्ती तिच्यावर नाराज होता, त्यामुळेच त्याने हे भयंकर कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुणे : 'टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो', वॉचमॅन 4 चिमुकल्या मुलींना 7 व्या मजल्यावर घेऊन गेला; अन्...
हिंदुस्तान वृत्तमाध्यमानुसार, संबंधित प्रकरण हे कंधला पोलीस ठाणे परिसरातील गढी दौलत येथील आहे. या विभागातील रहिवासी असलेले फारूक यांना पाच मुले आहेत. ते आपल्या कुटुंबासह वेगळ्या राहत होते. पत्नीचं नाव ताहिरा (वय 32) आणि दोन मुली, ज्यात अफ्रिन (वय 12) आणि सरीन ( वय 5) 10 डिसेंबरपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती.
तिघींची हत्या करून मृतदेह घरातच पुरल्याचा कबुलीनामा
याचदरम्यान, काहीतरी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने फारूकच्या वडिलांनी मंगळवारी सायंकाळी स्थानिक पोलिसांनी तक्रार दाखल करून घटनेची माहिती दिली होती. गावातील सरपंचांनी महिला आणि दोन मुली बेपत्ता असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी फारूकला ताब्यात घेत चौकशी सुरु केली, तिघींची हत्या करून मृतदेह घरातच पुरल्याचा कबुलीनामा दिला.
आरोपीने कबुल करत सांगितले की, पत्नी आणि दोन निष्पाप मुलींची हत्या करून त्यांचे मृतदेह हे सुमारे खोलीत नऊ फूट खड्ड्यात पुरण्यात आले. मात्र, पोलिसांनी मंगळवारी रात्री 10 वाजता पोलिसांनी घराचे खोदकाम केले तेव्हा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
हे ही वाचा : क्रूर बापाने 13 वर्षीय मुलाची गळा दाबून केली हत्या, मृतदेह तलावात दिला फेकून, धक्कादायक कारण समोर
पत्नीवर गोळी झाडून केली हत्या
अशातच 10 डिसेंबर रोजी रात्री फारूकने स्वयंपाक करत असलेल्या पत्नीवर गोळी झाडून हत्या करण्यात आली. जेव्हा मुली उठून बाहेर आल्या तेव्हा त्याने अफरीनवरही गोळीबार केला. त्याने सरीनचा गळा दाबून तिची हत्या केली. हत्या करून त्याने मृतदेह घरातच पुरला. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











