Crime News : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सोशल मीडियावरील मैत्रीचे रूपांतर एका भीषण हत्याकांडात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जमुनीपुर येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्याच प्रियकराने गळा आवळून आणि चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. अस्मित वर्मा (23) असे आरोपीचे नाव असून, त्याने हत्येनंतर मुलीचा मृतदेह शारदा कालव्या जवळील झुडपात फेकून दिला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT
असे जुळले प्रेम
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी आणि आरोपी अस्मित यांची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. एकमेकांच्या फोटोंवर लाईक आणि कमेंट्स करता करता त्यांच्यात संवाद वाढला आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मुलगी आरोपीवर लग्नासाठी सतत दबाव टाकत होती, मात्र अस्मितला तिच्याशी लग्न करायचे नव्हते. या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी त्याने तिला कायमचे संपवण्याचा कट रचला आणि तिला पळून जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर बोलावले.
हे ही वाचा : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचे 3 मोठे निर्णय, राज्यातील जनतेला खास गिफ्ट
पळून जाण्याच्या बहाण्याने बोलावले अन्..
मुलगी घरातून दागिने आणि रोकड घेऊन आरोपीला भेटायला आली. यावेळी संधी साधून अस्मितने तिच्यावर चाकूने सपासप वार केले आणि त्यानंतर स्वतःच्याच ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिचा मृतदेह जंगलातील झुडपात फेकून दिला आणि तिथून पळ काढला. 20 एप्रिलपासून मुलगी बेपत्ता असल्याने तिच्या आईने पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये अस्मितवर संशय व्यक्त करण्यात आला होता.
हे ही वाचा : 'विजय सरकार'चा शपथविधी, 29 वर्षीय किर्तनासह 9 आमदार होणार मंत्री; एक डॉक्टर तर 3 जण पोस्ट ग्रॅज्युएट
पोलिसी खाक्या दाखवताच..
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अस्मित वर्माला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारा अस्मित पोलिसी खाक्या दाखवताच बोलू लागला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितलेल्या ठिकाणावरुन पोलिसांनी गुरुवारी (7 मे) शारदा सहायक कालव्याच्या परिसरातील जंगलातून मुलीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह जप्त केला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.
ADVERTISEMENT











