मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचे 3 मोठे निर्णय, राज्यातील जनतेला खास गिफ्ट
Chief Minister Vijay's first moves : तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री विजय यांनी पदभार स्वीकारताच मोफत वीज आणि महिला सुरक्षेसह अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर स्वाक्षरी केली असून मागील सरकारच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचे 3 मोठे निर्णय
राज्यातील जनतेला खास गिफ्ट
Chief Minister Vijay's first moves : तमिळगा वेत्री कळघमचे प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी आज (दि.10) तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच निवडणुकीत मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर त्यांनी तातडीने सचिवालयात जाऊन अनेक महत्त्वाच्या फायलींवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यांनी घेतलेला पहिला मोठा निर्णय म्हणजे घरगुती ग्राहकांसाठी 200 युनिट मोफत वीज देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यासोबतच महिलांच्या सुरक्षेसाठी आणि राज्यातील अंमली पदार्थांच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष पथक स्थापन करण्याच्या निर्णयावरही त्यांनी शिक्कामोर्तब केले. आपल्या कारकिर्दीच्या पहिल्याच दिवशी जनहिताचे निर्णय घेऊन विजय यांनी आपल्या प्रशासकीय धोरणांचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा : उल्हासनगर : बहिणीने आनंदाने प्रेमविवाह केला, पण भावाच्या जातीच्या अहंगंडामुळे सूड उगवला
राज्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका निघणार
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विजय यांनी आपला मोर्चा राजकीय प्रतिस्पर्धी द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) कडे वळवला. 2021 ते 2026 या काळातील राज्याच्या आर्थिक स्थितीवर लवकरच श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. "डीएमके सरकारने आमच्यावर 10 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर सोडून दिला आहे. मागील सरकारने राज्यावर किती ओझे लादले आहे आणि मला कोणत्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, हे मला जनतेला सांगायचे आहे," असे विजय यांनी स्पष्ट केले. पारदर्शक प्रशासनाचे आश्वासन देताना त्यांनी जाहीरनाम्यातील प्रत्येक शब्द पाळणार असल्याचा पुनरुच्चार केला. तसेच एआयएडीएमकेवर टीका करताना त्यांनी सांगितले की, ते आपली जबाबदारी बंद दरवाजाआड नाही तर पारदर्शकपणे पार पाडतील.
हेही वाचा : 'विजय सरकार'चा शपथविधी, 29 वर्षीय किर्तनासह 9 आमदार होणार मंत्री; एक डॉक्टर तर 3 जण पोस्ट ग्रॅज्युएट









