Molestation news : एक्स बॉयफ्रेंडने आपल्या एक्स गर्लफ्रेंडला किस करणं महागात पडलेलं आहे. कारण एक्स गर्लफ्रेंडने तिचं यामागील नाते विसरून तिने विवाह केला होता. त्यानंतर तिने आपल्या बॉयफ्रेंडला आपल्यापासून दूर रहावं लागेल असे सांगितलं. तिने सांगूनही तिचा बॉयफ्रेंड तिच्या मागे सतत लागायचा. तिला अनेकदा फसवण्याचा प्रयत्नही करायचा. त्याने तिचे चुंबनही घेतले. तेव्हा महिलेचा राग अनावर झाल्याने तिने त्याची जीभ चावली. तरुणाचे नाव चंपी असून या घटनेनं परिसरात खळबळ माजली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पती भाजी विकून आला घरी, पत्नी प्रियकरासोबत अंथरुणात आक्षेपार्ह स्थितीत नको तेच.. नंतर लॉयल पतीलाही... भयंकर कांड
नेमकं काय घडलं?
महिलेनं तरुणाच्या जीभेचा चावा घेतल्यानंतर त्याच्या तोंडून रक्तस्त्राव होऊ लागला होता. तिचा आरडाओरड ऐकून गावकरी तिच्या मदतीला धावून आले. तेव्हा त्या तरुणाची जीभच जमीनवर पडल्याचे सांगण्यात येत आहे. याच धक्कादायक घटनेचं गुढ आता उकलले गेले आहे.
चंपीने तिच्यावर जबरदस्ती करत घेतला किस
महिला चुलीसाठी माती आणायला तलावावर गेली होती. तेव्हा तिला एकटं पाहून तिचा एक्स बॉयफ्रेंड चंपी तिच्याकडे आला. तेव्हा त्याने तिला पकडले आणि तिचा विनयभंग केला. तेव्हा तिने अनेकदा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, चंपीने तिच्यावर जबरदस्ती केली आणि नंतर तिचा किस घेतला.
हे ही वाचा : कोल्हापुरात डॉक्टर लेकीनं 78 वर्षीय वडिलांच्या बोटाचा चावा घेत तुकडा पाडला, अंगावर गाडी घालत शिवीगाळ अन् धमकी...
स्वत:च्या रक्षणासाठी किस घेताना महिलेनं घेतला त्याच्या जीभेचा चावा
महिलेनं स्वत:च्या रक्षणासाठी चंपीच्या जीभेचा चावा घेतला. तेव्हा चंपीच्या जीभेचा तुकडा पडला. तेव्हा त्याने आरडाओरड केली. त्याचक्षणी त्याचा आवाज ऐकून सर्वच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर त्यांनी चंपीच्या कुटुंबाला माहिती दिली, त्याला सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. प्रथमोपचार दिल्यानंतर, डॉक्टरांनी चंपीची गंभीर प्रकृती पाहून त्याला कानपूरातील हॅलेट हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. पोलीस उपायुक्त दिनेश त्रिपाठी यांनी घटनेची पुष्टी केली आणि सांगितलं की, आरोपीवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जात आहे.
ADVERTISEMENT











