पोटच्या लेकीला क्रूरपणे मारहाण, सिगारेटचे चटके देत केला छळ... बापाने पोलिसांना 'ते' क्षुल्लक कारण सांगितलं

तक्रारदाराने पोलिसांना सांगितलं की, दुपारी 2:45 च्या सुमारास आरोपीच्या पत्नीने त्याला एक व्हिडिओ पाठवला. यामध्ये पिता आपल्या अल्पवयीन मुलीवर क्रूरपणे मारहाण करताना दिसत होता.

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:05 PM • 02 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

झोपली का नाही म्हणून चिमुकलीला मारहाण

point

5 वर्षाच्या लेकीला दिले सिगारेटचे चटके

मुंबई : मानखुर्द परिसरात एका पित्यानं आपल्या 5 वर्षीय मुलीवर अमानवीय अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या क्रूर बापाने आपल्या मुलीच्या पायाला दोरीने बांधून तिला बेदम मारहाण केली आणि सिगारेटने तिच्या गालाला चटके दिले. मानखुर्द पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> विद्यार्थीनीची छेडछाड, पालकांनी शिक्षकाला शाळेच्या मैदानातच चोपलं, मुश्रीफांनी फोन केला आणि म्हणाले...

तक्रारदाराने पोलिसांना सांगितलं की, दुपारी 2:45 च्या सुमारास आरोपीच्या पत्नीने त्याला एक व्हिडिओ पाठवला. यामध्ये पिता आपल्या अल्पवयीन मुलीवर क्रूरपणे मारहाण करताना दिसत होता. व्हिडिओमध्ये आरोपीने मुलीचे पाय बांधलेले दिसत होते आणि तो तिला हाताने मारहाण करत होता. तसंच तिच्या गालावर सिगारेटने चटके देत होता. हा व्हिडिओ पाहून तक्रारदाराने तातडीने मानखुर्द पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि व्हिडिओ पुरावा म्हणून सादर केला.

पोलिसांना सांगितलं 'हे' कारण

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका महिला पोलीस अधिकाऱ्यासह तक्रारदाराला घेऊन आरोपीच्या घरी पोहोचले. तिथेच पीडित मुलीने पोलिसांना सांगितलं की, ती झोपत नव्हती म्हणून तिच्या वडिलांनी तिला मारहाण केली आणि सिगारेटने चटके दिले. पोलिसांनी तक्रारदाराच्या तक्रारीवरून आणि व्हिडिओ पुराव्याच्या आधारे आरोपीविरुद्ध भा.दं.वि. (BNS) कलम 115(2) आणि 118(1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

हे ही वाचा >> "मराठीतच बोलावं लागेल" म्हणत हिंदीत दम भरला, मनसैनिकांनी स्टॉल चालकाला केली मारहाण

 सध्या मानखुर्द पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, पीडित मुलीच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी आवश्यक पावलं उचलली जात आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून, पोलिसांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिलं आहे.

    follow whatsapp