Crime News : उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. संत कबीर जिल्ह्यातील खलीलाबादमध्ये कोतवाली भागातील मुशारा गावात एका प्रेयसीने तिच्या प्रियकराचे गुप्तांग छाटलं. प्रेयसीने असे कृत्य करण्यामागील कारण आता समोर आलं आहे. दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि त्या वादातून प्रेयसीने तिच्या प्रियकरासोबत असे कृत्य केलं. यानंतर संबंधित तरुण हा रक्तबंबाळ होऊन घरी परतला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुंबई हादरली! अल्पवयीन विद्यार्थ्याला शिक्षिका घेऊन जायची फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अन्... शिक्षिक विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा
घडलेला घटनाक्रम
या कृत्यानंतर कुटुंबियांनी पीडित तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी त्या तरुणावर उपचार सुरू करण्यात आले होते. खलीलाबाद कोतवाली परिसरातील जंगल कला येथील रहिवासी विकास निषाद (वय 19) सोमवारी शेजारच्या मुशारा गावातील त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला होता. दोघांचे प्रेमसंबंध होते. ते सहा वर्षांपासून एकमेकांना भेटायचे. सोमवारी विकासच्या मैत्रिणीने त्याला फोनद्वारे संपर्क करत भेटण्यासाठी घरी बोलावले.
यानंतर, विकास रात्री प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. दोघांनीही सुमारे सहा तास एकत्र घालवले. त्यानंतर दोघांमध्ये वादाला तोंड फुटलं आणि या वादातून प्रेयसीने विकासच्या प्रायव्हेट पार्टवर धारदार ब्लेडने हल्ला केला. यामुळे रक्तस्त्राव होऊ लागला होता. यामुळे प्रकृतीत आणखी बिघाड झाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणाची माहिती कुटुंबाला कळताच त्यांनी तात्काळपणे रुग्णालयात दाखल केलं. विकासवर रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये उपचार सुरू करण्यात आले.
हेही वाचा : अंगारक योगामुळे 'या' राशीच्या लोकांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागणार
विकासच्या आईची प्रतिक्रिया
विकास बेशुद्ध पडला होता. तीन तासानंतर रक्तस्त्राव थांबला. त्यानंतर विकासला रक्तदान करण्यात आले असता, तो शुद्धीवर आला. विकासच्या आईने सांगितले की, तिनं मुलाला भेटायला बोलावले होते. तिनेच माझ्या मुलाच्या गुप्तांगावर हल्ला केला आणि त्यामुळे मुलाचा जीव आता धोक्यात आला आहे.
ADVERTISEMENT
