अल्पवयीन मुलाचे मुलीशी अश्लील चाळे, ग्रामस्थांच्या आरोपानं खळबळ, खांबाला बांधून मारहाण करत व्हिडिओ रेकॉर्ड केले

मुंबई तक

• 02:51 PM • 18 Mar 2026

Viral News : एका मुलाला गावातील खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. मुलगा हा अल्पवयीन असून त्याला गावातील एका मुलीसोबत अश्लील कृत्य करताना ग्रामस्थांनी पाहिले होते. याच प्रकरणात मुलाला बेदम मारहाण करण्यात आली.

Viral News

Viral News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

ग्रामस्थांकडून मुलाला खांबाला बांधून मारहाण

point

व्हिडिओ चित्रित करून सोशल मीडियावर व्हायरल

Viral News : एका मुलाला गावातील खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. मुलगा हा अल्पवयीन असून त्याला गावातील एका मुलीसोबत अश्लील कृत्य करताना ग्रामस्थांनी पाहिले होते. याच प्रकरणात मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री उशिराने उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे. अल्पवयीन जोडपे मुलीच्या घरी अश्लील कृत्य करताना रंगेहाथ पकडल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सातारा : प्राध्यापकाचे तरुणीला अश्लील मेसेज, नंतर शरीरसुखाची मागणी, लाज आणणारा प्रकार

ग्रामस्थांकडून मुलाला खांबाला बांधून मारहाण, नंतर व्हिडिओ व्हायरल केले

या घटनेनं गाव हादरून गेलं असून गावात संताप व्यक्त केला जात आहे. याच संतापातून ग्रामस्थांनी मुलाला गावातील एका खांबाला बांधलं आणि बेदम मारहाण केली. काही लोकांनी त्याचे चित्रीकरण केलं आणि सोशल मीडियावर शेअर केलं. त्या व्हिडिओत मुलागा खांबाला बांधलेल्या अवस्थेत असून बेदम मार खात असल्याची माहिती आहे. (व्हिडिओबाबत मुंबई तक कसलाही दुजोरा देत नाही)

हे ही वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, ठाकरेंचे निम्म्याहून अधिक खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत

अल्पवयीन मुलांचे कृत्य एका ग्रामस्थाने पाहिले, त्याने सर्वांना एकत्र करून त्या मुलाला मारहाण केली. नंतर स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, 112 पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गावकऱ्यांच्या ताब्यातून मुलाची सुटका करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणी तक्रार करण्यात आली नसून पोलीस तपास करत आहेत.