Crime News : खाजगी रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रसूतीसाठी रुग्णालयात आलेल्या एका गर्भवती महिलेला एका नर्सिंग अटेंडंटने दाखल करून घेतले आणि स्वत:च सिझेरियन शस्त्रक्रिया केली. महिलेनं जेव्हा प्रतिकार केला असता, नर्सने तिचे हात पाय घट्ट बांधले. शस्त्रक्रियेदरम्यान, त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं संबंधित नर्सला मोठा धक्का बसला होता. ही घटना उत्तर प्रदेशातील बदाऊन येथील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबई: 13 मजली इमारतीला भीषण आग, 3 मुलांसह 9 जण जखमी
रुग्णाला टेबलवर ठेऊन नर्स छतावर जाऊन बसली
महिलेनं तिचा मृतदेह हा ऑपरेशन टेबरवर ठेवला आणि तिला तसेच सोडून ती छतावर लपून बसली होती. या घटनेची माहिती समजताच, महिलेच्या कुटुंबीयांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. या प्रकरणात घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त दाखल करण्यात आला होता. आणि त्यांना मोठ्या मुश्कीलीने शांत केले. यानंतर पोलिसांनी आरोपी नर्सला छतावरून उतरवले आणि बेड्या ठोकल्या.
ऑपरेशनमध्ये केली सिझेरियन प्रसूती
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिलेची सुधीर कुमारची पत्नी सोनी अशी ओळख समोर आली. बदाऊनच्या मुजारिा पोलीस ठाणे परिसरात सागराई गावातील रहिवासी असलेल्या सोनी यांना प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या होत्या, त्यादरम्यान रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नव्हते. अशा परिस्थिती असूनही नर्सने पीडित रुग्ण सोनी यांना केवळ दाखलच केले नाही, तर त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन सिझेरियन प्रसूती केली.
हे ही वाचा : बांगलादेशचं नाव घेत सत्ता बदलावर मोहन भागवत यांचं मोठं विधान
नर्सने रुग्ण गर्भवती महिलेचे हातपाय बांधले
ऑपरेशन सुरु असताना जेव्हा महिला प्रतिकार करू लागली असता, आरोपी महिला नर्सने तिचे हातपाय बांधले, दरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आहे. या घटनेनं रुग्णालयात उपस्थित असलेल्या कुटुंबीयांनी आरडाओरड सुरु केली. नंतर छतावर लपून बसलेल्या नर्सला पोलिसांनी अटक केली. कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली.
ADVERTISEMENT












