बापाने मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप, नवऱ्याचा मृतदेह रेल्वेरुळाखाली फेकला

मुंबई तक

• 08:33 AM • 22 Oct 2026

Crime News : आपला नवरा लेकीचा विनयभंग करत असल्याचा महिलेचा आरोप आहे. तिने याच रागातून नवऱ्याच्या डोक्यात प्राणघातक हल्ला केला. हल्ला करण्यात आलेला व्यक्ती हा महिलेचा दुसरा पती असल्याची माहिती आहे. त्याच्या मृत्यूनंतर तिने त्याचा मृतदेह उचलून रेल्वे रुळावर फेकून दिला.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

व्यक्तीचा कोणत्या परिस्थितीत मृत्यू झाला? 

point

डोक्यात हल्ला केल्याचा कबुलीनामा

Crime News : केरळच्या कोच्ची येथून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपला नवरा लेकीचा विनयभंग करत असल्याचा महिलेचा आरोप आहे. तिने याच रागातून नवऱ्याच्या डोक्यात प्राणघातक हल्ला केला. हल्ला करण्यात आलेला व्यक्ती हा महिलेचा दुसरा पती असल्याची माहिती आहे. त्याच्या मृत्यूनंतर तिने त्याचा मृतदेह उचलून रेल्वे रुळावर फेकून दिला. ही घटना केरळातील एलामक्कार पोलीस ठाणे परिसरातील आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पतीच्या डोळ्यादेखत वाघाने पत्नीवर केला हल्ला, नवरा बघतच राहिला अन्..

पोलिसांच्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर रोजी रात्री एर्नाकुलन नॉर्थ आणि एडप्पली रेल्वे स्थानकांदरम्यान असणाऱ्या रेल्वे रुळांवर ट्रेनच्या लोको पायलटला एक मृतदजेह आढळून आला होता. रेल्वे सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. पोलीस आणि आरपीएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. 

व्यक्तीचा कोणत्या परिस्थितीत मृत्यू झाला? 

मृतदेहाच्या प्राथमिक तपासानंतर, पोलिसांना संशय आला की, त्या व्यक्तीचा मृत्यू हा ट्रेनच्या धडकेने झालेले नाही. मृतदेह हा जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला होता. सुरुवातीला अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आता पोलिसांसमोर दोन प्रश्न होते, एक म्हणजे मृतदेह कोणाचा आणि त्या व्यक्तीचा कोणत्या परिस्थितीत मृत्यू झाला? 

डोक्यात हल्ला केल्याचा कबुलीनामा

तपासातून पोलिसांना समजले की, मृताचे कुटुंब हे पुथुक्कलवट्टम भागातील रेल्वे रुळांवर राहत होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, त्यांनी कुटुंबाची चौकशी सुरू केली. पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेच्या जबाबातून विसंगती आढळून आली. त्यानंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेत कसून चौकशी केली. चौकशदरम्यान, त्या महिलेनं आपल्या पतीच्या डोक्यात हल्ला केल्याचा कबुलीनामा दिला होता. 

हे ही वाचा : 'कर्ज फेडलं नाहीतर नखं उपटून मिरचीची पूड टाकेन', धमकीने तरुणाचा मृत्यू

दरम्यान, महिलेनं सांगितलं की, तिच्या पतीने तिच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस आता आरोपीची कसून चौकशी करत आहेत. सध्या पोलीस पीडित मुलीचा जबाब नोंदवत आहेत. महिलेनं पतीची कथितरित्या हत्या करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकला.