नवरा नाही हा तर राक्षस, लेकराच्या डोळ्यादेखत पतीने बायकोला दगडी जात्याखाली चिरडलं, तिन्ही लेकरं पोरकी

Crime news : एका पतीने आपल्या निष्पाप पत्नीवर जात्याने हल्ला करत तिची हत्या केली. नवरा दारूच्या नशेत असताना हे कृत्य केलं. बायकोची हत्या केल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढत फरार झाला. या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे.

crime news

crime news

मुंबई तक

• 01:46 PM • 18 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवऱ्याने दारूच्या नशेत बायकोला जात्याखाली चिरडलं

point

लेकराच्या डोळ्यादेखत बापामध्ये राक्षस संचारला

Crime news : एका पतीने आपल्या निष्पाप पत्नीवर जात्याने हल्ला करत तिची हत्या केली. नवरा दारूच्या नशेत असताना हे कृत्य केलं. बायकोची हत्या केल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढत फरार झाला. या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास केला. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपी पतीचा शोध सुरु आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील महोबा येथे घडलेली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सातारा : प्राध्यापकाचे तरुणीला अश्लील मेसेज, नंतर शरीरसुखाची मागणी, लाज आणणारा प्रकार

नवऱ्याने दारूच्या नशेत बायकोला जात्याखाली चिरडलं

या खळबळजनक हत्याकांडाची घटना श्रीनगर पोलीस ठाणे हद्दीतील भंडारा येथे घडली. नवऱ्याचे नाव रामसिंग राजपूत असे असून त्याने दारूच्या नशेत बायको पवन हिला (वय 36) जात्याखाली चिरडून ठार केलं. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढल्याचं चित्र आहे. सकाळ होताच शेजाऱ्यांना या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपी पतीचा शोध सुरु आहे. 

दरम्यान, नवरा दारू पिऊन सतत मारहाण करत असल्याने पीडित महिलेनं माहेर गाठलं होतं. त्यानंतर तिने आपल्या भावंडांना घडलेला प्रकार सांगितला होता. काही दिवस निघून गेल्यानंतर त्या भावंडांनी सर्व ठीक होईल या आशेनं तिच्या सासरी पाठवले होते. पण, रात्री दारू पिऊन नवरा रामसिंग पवनने निर्दयपणे मारहाण केली. 

हे ही वाचा : बलात्कार प्रकरणातील आरोपी ज्योतीषाने स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर संचालक, अंधारेंचे सनसनाटी आरोप

आईच्या मृत्यूनंतर, पियुष (वय 11), मुलगी परी (वय 9) आणि मुलगा आयुष (वय 7) यांना रडू आवरत नव्हतं. सांगितले जात आहे की, आयुषसमोरच बायकोची हत्या केली होती. दरम्यान, आरोपीवर गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. 
 

    follow whatsapp