Mumbai: शिक्षिका चटावलेली शरीर संबंधांना, विद्यार्थ्याला घेऊन जायची थेट 5 स्टार हॉटेलच्या रुममध्ये अन्...
Mumbai Crime News : मुंबईतील दादरमध्ये एका नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेनं अल्पवयीन विद्यार्थ्यावर बलात्काराचा आरोप केला. याच आरोपाखाली महिला शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईतील दादरमध्ये शिक्षिकेनं विद्यार्थ्याचं केलं लैंगिक शोषण

शिक्षिकेला पोलिसांनी केली अटक
Mumbai Crime News : मुंबईतील दादरमध्ये एका नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेनं अल्पवयीन विद्यार्थ्यावर बलात्काराचा आरोप केला. याच आरोपाखाली महिला शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे. दादर पोलिसांनी या शिक्षिकेविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती आता समोर आली आहे.
हेही वाचा : गर्लफ्रेंडनं लग्नाला नकार दिला म्हणून हत्येचा कट, गावठी पिस्तूल घेऊन निघाला पण रस्त्यात... थरकाप उडवणारी घटना
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरापासून पीडित विद्यार्थ्यावर हा लैंगिक अत्याचार सुरू होता. याच काळात, आरोपी शिक्षिकेनं विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेलं आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्याने गप्प रहावं यासाठी गुंगीच्या गोळ्या द्यायची.
गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण होत होते असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर विद्यार्थ्याने वर्षभरात घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. कुटुंबियांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तसेच पोलिसांनी त्वरित कारवाई करत शिक्षिकेला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
विद्यार्थ्याला मद्य पाजून...
पीडित विद्यार्थ्यावर दक्षिण मुंबईतील अनेक फाईव्ह स्टारमध्ये तसेच विमानतळाजवळील लॉजमध्ये लैंगिक अत्याचार करत होती. तसेच अनेकदा तिनं पीडित विद्यार्थ्याला जबरदस्ती मद्य पाजलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.
महिला शिक्षिकेला अटक केल्यानंतर देशातील एका प्रतिष्ठित शाळेला मोठा धक्का बसला आहे. ही शिक्षिका पोलीस कोठडीत असून पोलीस याचा खोलवर तपास करत आहेत. हे शोषण सुरू झाल्यानंतर काही महिन्यानंतर विद्यार्थ्याच्या वागणयात बोलण्यात बदल दिसून आलाय, विद्यार्थ्याचे शालेय शिक्षण पूर्ण व्हावे असं पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांचं म्हणणे होते.
हेही वाचा : अंगारक योगामुळे 'या' राशीच्या लोकांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागणार
हे प्रकरण जेव्हा समोर आलं तेव्हा विद्यार्थ्याच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त करण्यात आली होती. शाळा आणि पालक दोघांनाही मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी शिक्षिकेच्या मोबाईलमधील चॅट्स, हॉटेल बुकिंग्ज आणि इतर डिजिटल पुरावे ताब्यात घेृतले. यामुळे आता शिक्षिकेवर मोठी कारवाई केली जाईल अशी माहिती समोर येत आहे.