विद्यार्थीनीची छेडछाड, पालकांनी शिक्षकाला शाळेच्या मैदानातच चोपलं, मुश्रीफांनी फोन केला आणि म्हणाले...

मुंबई तक

2 जुलै रोजी सकाळी 10:40 च्या सुमारास आरोपी मुल्ला याने पुन्हा तिच्याशी अभद्र वर्तन केलं. यानंतर पीडित छात्रेच्या पालकांनी शाळा गाठून मुल्लाला जाब विचारला. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Kolhapur : कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील जस्टिस रानडे शाळेमध्ये सहायक शिक्षक निसार मुल्ला यानं एका विद्यार्थीनीशी छेड़छाड़ केल्याची घटना घडली. ही धक्कादायक घटना 2 जुलै 2025 रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मुल्लाला चांगलंच चोपलं आणि त्याला मुरगुड पोलिसांच्या स्वाधीन केलं. शाळा प्रशासनाने तातडीने कारवाई करत मुल्लाला नोकरीवरून बरखास्त केलं. पोलिसांनी मुल्लाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निसार मुल्ला बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थीनीशी छेडछाड करत होता.

हे ही वाचा >> गर्लफ्रेंडनं लग्नाला नकार दिला म्हणून हत्येचा कट, गावठी पिस्तूल घेऊन निघाला पण रस्त्यात... थरकाप उडवणारी घटना

बुधवारी, 2 जुलै रोजी सकाळी 10:40 च्या सुमारास त्याने पुन्हा तिच्याशी अभद्र वर्तन केलं. यानंतर पीडित छात्रेच्या पालकांनी शाळा गाठून मुल्लाला जाब विचारला. ही बाब गावात पसरताच संतप्त ग्रामस्थांनी शाळेमध्ये धाव घेतली आणि मुल्लाला बाहेर ओढत त्याला मारहाण केली. ग्रामस्थांनी शाळेमध्ये बैठक घेऊन या कृत्याचा निषेध केला आणि सेनापति कापशी गाव बंद ठेवून निदर्शनं केली.यापूर्वी मुल्लाने मुरगुड येथे कार्यरत असताना देखील अनेक विद्यार्थीनींशी छेड़छाड़ आणि असभ्य वर्तन केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणाची दखल घेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी पोलिसांना फोनवरून कठोर कारवाईचे आदेश दिले. 

हे ही वाचा >> कर्जाच्या बदल्यात 4 फ्लॅट लिहून घेतले, पोलीस आणि दलालाच्या त्रासाला कंटाळून बिल्डरने स्वत:ला संपवलं

मुरगुड पोलिसांनी मुल्लाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. शाळा प्रशासनाने निवेदन जारी करत सांगितलं की, निसार मुल्लाला तात्काळ बरखास्त करण्यात आलं आहे. अशा कृत्यांविरुद्ध शाळा कठोर धोरण अवलंबणार असल्याचं म्हटलं आहे. ग्रामस्थांनी अशा घटना रोखण्यासाठी शाळांमध्ये कडक सुरक्षा उपाययोजनांची मागणी केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp