पालघर : पालघर जिल्ह्यातील अचोले परिसरात बिल्डर जयप्रकाश चव्हाण यांनी राहत्या गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेनं पालघर जिल्हा हादरला. या घटनेनंतर कुटुंबात हळहळ व्यक्त होत असून, दोन पोलीस कर्मचारी आणि एका प्रॉपर्टी डीलरवर मानसिक छळ आणि धमक्यांचे गंभीर आरोप कुटुंबीयांनी केले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> कोकणातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, पुणे आणि साताऱ्यातील एकूण मान्सून परिस्थिती?
माझ्या वडिलांना धमक्या दिल्या होत्या...
घटनास्थळावरून एक सुसाइड नोट सापडली असून, पोलीस त्याची तपास णी करत आहेत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, जयप्रकाश चव्हाण यांनी एका बिल्डिंग प्रोजेक्टसाठी 33 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यापैकी 32 लाख रुपये त्यांनी परतफेड केले होते. तरीही, दोन पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या दलालाने त्यांच्यावर दबाव टाकून चार फ्लॅट जबरदस्तीने नावावर करून घेतल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा >> 'त्यांनी' विवाहित तरूणाचा प्रायव्हेट पार्टच टाकला कापून, तरुणाने घरी जाऊन पत्नीला सांगितलं अन्...
जयप्रकाश यांची मुलगी गौरी चव्हाण म्हणाली, "माझे वडील गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावात होते. त्यांना सतत धमक्या दिल्या जात होत्या. या मानसिक छळामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचललं.
पोलिसांकडून चौकशी सुरू
घटनेची माहिती मिळताच अचोले पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी सुसाइड नोट ताब्यात घेतली असून, त्याची तपासणी सुरू आहे. या प्रकरणात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद (ADR) करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी केली जाईल.
हे ही वाचा >> कोकणातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, पुणे आणि साताऱ्यातील एकूण मान्सून परिस्थिती?
कुठल्याही सरकारी कर्मचारी किंवा इतर व्यक्तीची भूमिका संशयास्पद आढळली, तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे. पोलीस आणि प्रॉपर्टी डीलरच्या कथित कृत्यांमुळे एका कुटुंबाचा आधार हरपल्यानं स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात पुढील तपास काय दिशा घेतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT
