NIA ISIS : ठाणे, पुण्यासह 41 ठिकाणी एनआयएच्या धाडी, 13 जणांना अटक; प्रकरण काय?

भागवत हिरेकर

09 Dec 2023 (अपडेटेड: 09 Dec 2023, 04:43 AM)

NIA Raids ISIS Module : केंद्रीय तपास यंत्रणा (एनआयए) इसिस विरोधात सतर्क झाली आहे. एनआयएने ठाणे, पुण्यासह देशातील ४१ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.

The National Investigation Agency (NIA) has conducted major raids simultaneously at 41 places across the country against the conspiracy of the terrorist organization ISIS.

The National Investigation Agency (NIA) has conducted major raids simultaneously at 41 places across the country against the conspiracy of the terrorist organization ISIS.

follow google news

NIA Raids in Isis module : एनआयए अर्थात केंद्रीय तपास यंत्रणेच्या पथकांनी एकाच वेळी देशातील 41 ठिकाणी धाडी टाकल्या. धाडी टाकण्यात आलेली सर्वाधिक ठिकाण महाराष्ट्रातील आहे. एनआयएच्या पथकांनी शनिवारी (9 डिसेंबर) मुंबई, ठाणे, मीरा भायंदर, पुण्यात धाडी टाकत आयएसआयएस मॉड्युलविरोधात मोठी मोहीम चालवली. पुण्यात उघडकीस आलेल्या इसिस दहशतवाद मॉड्युल प्रकरणात एनआयएने पुन्हा काही जणांना अटक केली आहे.

हे वाचलं का?

इसिस दहशतवाद मॉड्युल प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनआयएने देशातील 41 ठिकाणी धाडी टाकल्या. मुंबई, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, पुणे, मीरा भायंदरसह कर्नाटकात धाडी टाकण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >> NIA : डॉक्टरची पुण्यातून घातक कृत्ये? तरुणांना लावत होता इसिसच्या नादाला!

मिळालेल्या माहितीनुसार एनआयएने धाडसत्रादरम्यान दहशतवाद्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन, इसिस हॅण्डलर्सच्या सहभागाने एक मोठा कट उधळून लावला आहे. एनआयएच्या तपासात हे समोर आले आहे की, भारतात इसिसच्या विचारधारेचा प्रचार, प्रसार करणाऱ्या कट्टर लोकांचं नेटवर्क तयार झाले आहे.

इसिस दहशतवाद मॉड्यूल

एनआयएने देशात इसिसविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. 18 जुलै रोजी पुणे पोलिसांनी दोन जणांना अटक केली. चोरी प्रकरणातील आरोपींच्या चौकशीत इसिसचे घातपाताचा कट समोर आला होता. या प्रकरणाचा तपास सुरूवातीला एटीएसने केला. नंतर त्याची व्याप्ती मोठी असल्याने एनआयएकडे देण्यात आला.

13 लोकांना अटक

एनआयएने कारवाईदरम्यान 13 लोकांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात दोन ठिकाणी, ठाणे जिल्ह्यात नऊ ठिकाणी, मीरा भाईंदरमध्ये एका ठिकाणी, तर ठाणे ग्रामीणमधील 31 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्याचे ANI वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

जुलैमध्ये एनआयएने तबीश नासेर सिद्दीकीला मुंबईतून अटक केली होती. त्याचबरोबर झुबेर नूर मोहम्मद शेख उर्फ अबू नौसेबाला पुण्यातून, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला याला ठाण्यातून आणि डॉ. अदनान सरकार याला पुण्यातील कोंढवा भागातून अटक केले होते.

    follow whatsapp