Crime News : पती -पत्नीच्या नात्यामुळे संसाराचा गाडा चालतो. तर वडील आणि लेकीच्या नात्यानं घराला घरपण येऊन घर फुलून निघते. पण पत्नीनं आणि लेकीनं आपल्या बॉयफ्रेंडला हाताशी घेऊन वडिलांच्या हत्या करण्याचा कट रचला होता. त्यानंतर हा कट यशस्वी देखील केला. उत्तर प्रदेशातील मेरठमधील ही काळीज हेलावून टाकणारी घटना आता समोर आली आहे. आता याच घटनेची एकूण माहिती पोलिसांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, नंतर तिघांकडून सेटरबंद दुकानात तरूणावर कोयत्याने सपासप वार, धक्कादायक कारण आलं समोर
माय लेकीनं सुभाषला संपवण्याचा रचला कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जून 2025 रोजी जानी पोलीस ठाणे परिसरात सुभाष उपाध्याय (वय 45 ) शेतकरी यांची शेतातून घरी परतताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. संबंधित तपासातून दिसून आले की, सुभाषची पत्नी कविताचे गुलजार नावाच्या एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते, तर त्यांची मुलगी सोनमचे विपिन नावाच्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. एका बाजूला पत्नीचं परपुरूषासोबत अनैतिक संबंध तर दुसरीकडे लेकीचे बाहेर अफेयर सुरू असल्याने सुभाष चिंतेत होता. अशातच माय लेकीचं आपल्या नवऱ्याला आणि वडिलांना मारण्याचा कट होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. विपिन ताडा म्हणाले की, सुभाषच्या हत्येच्या कटात त्याची पत्नी कविता, मुलगी सोनम, कविताचा प्रियकर गुलजार आणि सोनमचा बॉयफ्रेंड विपिन हे आरोपी होते. सुभाषच्या मोठ्या मुलीचाही (सोनम व्यतिरिक्त आणखी एक मुलगी) प्रेमविवाह झाला होता. वडील सुभाषने या विवाहाला मान्यता दिली होती. परंतु कविता आणि धाकटी लेक सोनमच्या अनैतिक संबंधांचा त्याला खूप त्रास व्हायचा. म्हणूनच त्याला संपवण्याचं प्लॅनिंग करण्यात आलं.
सुभाषवर सुनियोजितपणे गोळीबार
दरम्यान, 23 जून रोजी रात्री ती शेतातून घरी परतली असताना सुभाषवर सुनियोजितपणे गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी हत्येत वापरलेले अवैधपणे पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली. शिवाय या घटनेत वाहन आणि इतर पुरावेही जप्त करण्यात आले होते. जीनी पोलिसांनी पाचही आरोपींना आता अटक केली आहे.
हेही वाचा : MMRDA च्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा! गरिब कुटुंब आले रस्त्यावर, 'त्या' महिलेचा असा झाला पर्दाफाश
आयुष विक्रम सिंह यांनी माहिती दिली की, हा एक मोठा गुन्हा आहे. यामुळे कौटुंबिक नातेसंबंधामध्ये कटुता निर्माण झाली. त्याच्या नातेसंबंधांमध्ये सुभाषच एक मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे निष्पाप सुभाषचा खून करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT
