Pune: दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, नंतर दुकानात तरूणावर कोयत्याने सपासप वार, धक्कादायक कारण आलं समोर
pune crime news : ग्रामीण पुण्यातील शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करत हल्ला केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ग्रामीण पुण्यातील शिरूर तालुक्यात धक्कादायक घटना

प्रेमविवाहाच्या प्रकरणातून तरुणीवर कोयत्याने वार
Pune Crime News : ग्रामीण पुण्यातील शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करत हल्ला केला. कुडांई मेन्स पार्लर नावाच्या एका सलूनमध्ये ही घटना घडली आहे. सलूनची तोडफोड करून मालकावर लोखंडी कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडिताचं नाव दत्तात्रेय वाघ (वय 22) हा गंभीर जखमी झाला. शिरूर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा : मुंबईत पाऊस धो धो बरसणार! 'या' ठिकाणी दिसणार पावसाचं रौद्ररूप..कसं आहे आजचं हवामान?
नेमकं काय घडलं?
दत्तात्रेय वाघ आणि त्याची पत्नी स्नेहा हे दोघेही टाकळी हाजी येथे राहत होते. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी आळंदी देवाची येथे प्रेमविवाह केला. मात्र, स्नेहाच्या नातेवाइकांना हा विवाह मान्य नव्हता. स्नेहाचा मावसभाऊ जीवन रविंद्र गायकवाड हे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कानगाव येथील रहिवासी आहेत. रविंद्र यांच्या नात्यातील इतर व्यक्तींनी यापूर्वी अनेकदा दत्तात्रेयला जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. यासंदर्भात दत्तात्रेयने पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.
शटर बंद करून...दत्तात्रेयवर कोयत्याने वार
याचदरम्यान आता शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री घडली. दत्तात्रेय आपल्या कुडांई मेन्स पार्लरमध्ये शटर बंद करून अशुतोष भाकरे या ग्राहकाचे केस कापत होता. यावेळी जीवन गायकवाड, शाहरूख शेख (वय 26) आणि प्रशांत साठे (वय 19) हे तिघेही संबंधित सलूनमध्ये घुसले. त्यानंतर त्यांनी सलूनची तोडफोड केली. सलूनच्या काचा फोडल्या, सलूनमध्ये असणाऱ्या साहित्यांची नासधूस केलीय. तसेच जीवनकडे कोयता होता त्याने दत्तात्रेयवर हल्ला करत सपासप वार केले. यात दत्तात्रेयच्या डाव्या हाताच्या मनगटावर आणि पाठीवर गंभीर वार करण्यात आलेत. या हल्ल्यानंतर तिघांनीही मोटारसायकलवरून रांजणगावाच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
संबंधित हल्ल्याची माहिती मिळताच, स्थानिक गावकऱ्यांनी तातडीने पाठलाग करून शेख आणि प्रशांत साठेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर दोघांनाही टाकळी हाजी पोलीस ठाण्यात आणलं गेलं. दरम्यान, मुख्य आरोपी असणारा जीवन गायकवाड हा सध्या फरार आहे. तर पोलीस त्याचा शोध घेण्याचं काम करत आहेत.
हेही वाचा : MMRDA च्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा! गरिब कुटुंब आले रस्त्यावर, 'त्या' महिलेचा असा झाला पर्दाफाश
अशातच आता पीडित तरुण दत्तात्रेयला शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्याच्या तक्रारीनुसार, शिरूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सर्व परिस्थिती पाहिली आणि पंचनामा केला आहे. याच प्रकरणातील पुढील तपास सुरू असल्याची माहिती समोर येते.