शाळकरी मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवलं अन् स्कूल व्हॅनमध्येच चालकाचा 14 वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्कार...

नववीत शिकणाऱ्या एका 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीवर स्कूल व्हॅन चालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. हे धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर आता पालकांच्या मनात मुलांच्या सुरक्षिततेसंबंधी प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:14 PM • 24 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

शाळकरी मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवलं अन्...

point

स्कूल व्हॅनमध्येच चालकाचा 14 वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्कार...

Crime News: नववीत शिकणाऱ्या एका 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीवर स्कूल व्हॅन चालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. हे धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर आता पालकांच्या मनात मुलांच्या सुरक्षिततेसंबंधी प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित घटना ही गुजराच्या राजकोट शहरात घडल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेच्या आईने राजकोटमधील मालवीय नगर पोलिस ठाण्यात या प्रकरणासंबंधी तक्रार दाखल केली, त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.

हे वाचलं का?

पीडितेच्या आईने तक्रारीत सांगितलं की, आरोपी स्कूल व्हॅन चालक रमेश खारा हा बऱ्याच काळापासून पीडितेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी या प्रकरणी आयपीसीच्या कलम 75(2), 64(1), 65(1), 351(3) आणि पोक्सो कायद्याच्या कलम 4 आणि 8 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

पीडित मुलीची आई म्हणाली की, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आपली मुलगी शांत होती. आईने तिची विचारपूस केल्यानंतर मुलीने सांगितलेलं कारण ऐकून तिला मोठा धक्का बसला. पीडिता म्हणाली की, स्कूल व्हॅन ड्रायव्हर तिला बऱ्याच चॉकलेट द्यायचा आणि चुकीच्या हेतूने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. 17 जानेवारी रोजी, परीक्षा झाल्यानंतर आरोपी रमेश खारा, पीडितेला त्याच्या व्हॅनमधून घरी सोडत होता. त्यावेळी आरोपी व्हॅन चालकाने तिचा विनयभंग केला. पीडित विद्यार्थिनीने याचा विरोध केला तेव्हा आरोपीने तिला धमकावलं आणि याबद्दल कोणालाही सांगितल्यास तिला आणखी त्रास देण्याची धमकी दिली. 

हे ही वाचा: एकतर्फी प्रेमात बनला हैवान, नगरसेवकाच्या मुलाने 10 वीत शिकणाऱ्या मुलीला जिवंत जाळलं... 6 दिवसांनंतर पीडितेचा मृत्यू

व्हॅनमध्येच चालकाचा मुलीवर बलात्कार...  

19 जानेवारी रोजी शाळेत जाण्यासाठी पीडिता स्कूल व्हॅनमधून बसली मात्र, शाळेत सोडण्याऐवजी त्या व्हॅन चालकाने तिला एका निर्जन ठिकाणी नेलं आणि तिथे गाडी थांबवली. बाहेरून काहीही दिसू नये म्हणून त्याने व्हॅनच्या खिडक्या काळ्या जाळीने झाकल्या. त्यानंतर, त्याने त्या निष्पाप मुलीवर बलात्कार केला. मुलगी रडत रडत त्याला विनवण्या करत होती मात्र, आरोपीने त्याचं घाणेरडं कृत्य करण्यास थांबवलं नाही आणि तो तिला घरी सोडून निघून गेला.

घरी पोहोचल्यानंतर, पीडितेने धाडस करून संपूर्ण घटना तिच्या कुटुंबियांना सांगितली. आई-वडिलांनी तात्काळ शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला आणि त्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना या घटनेबाबत कळवण्यात आलं. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तात्काळ कारवाई केली आणि आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली स्कूल व्हॅन देखील जप्त करण्यात आली आहे.

    follow whatsapp