Instagram वर 50 पेक्षा जास्त मुलींना फसवलं; पोलिसांनी असं केलं गजाआड

मुंबई तक

27 Feb 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 07:28 PM)

Delhi cyber crime : राजधानी दिल्लीतील सायबर पोलिसांनी (Delhi Cyber Police) एका 32 वर्षीय इंटिरियर डिझायनरला (Interior Designer) इंस्टाग्रामवर (instagram) तरुणींना त्रास देणं आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक केली आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला शनिवारी पकडण्यात आले असून तो व्यवसायाने इंटेरियर डिझायनर असून त्याने अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. (Delhi cyber police arrested […]

Mumbaitak
follow google news

Delhi cyber crime : राजधानी दिल्लीतील सायबर पोलिसांनी (Delhi Cyber Police) एका 32 वर्षीय इंटिरियर डिझायनरला (Interior Designer) इंस्टाग्रामवर (instagram) तरुणींना त्रास देणं आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक केली आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला शनिवारी पकडण्यात आले असून तो व्यवसायाने इंटेरियर डिझायनर असून त्याने अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. (Delhi cyber police arrested to interior Designer)

हे वाचलं का?

Crime : Google वर कस्टमर केअरचा नंबर शोधला, फोन केला अन् लाखो रुपये…

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, 32 वर्षीय इंटेरिअर डिझायनर प्रदीप शर्मा सोशल मीडियावर मुलांसोबत महिला बनून मैत्री करत असे. मग त्यांना ब्लफवर घेऊन तो त्यांच्या मैत्रिणींचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो मागवायचा. यानंतर तो त्याच व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून मुलाच्या महिला मैत्रिणींना ब्लॅकमेल करत असे. लैंगिक अत्याचार करायचा.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, मुलींचे फोटो/व्हिडिओ मिळाल्यानंतर आरोपी इतर बनावट प्रोफाइल वापरून इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवत ब्लॅकमेल करायचा. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला आयफोन आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने 50 हून अधिक मुलींना ब्लॅकमेल करून त्यांचे लैंगिक शोषण केले आहे. पोलिसांना आरोपीच्या फोनवरून 50 हून अधिक मुलींचे व्हिडिओ आणि फोटो मिळाले आहेत.

याप्रकरणी महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गुन्हा दाखल केला होता

खरं तर, एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती की एक अज्ञात व्यक्ती तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पाठवून तिला त्रास देत आहे. आरोपीने विद्यार्थिनीला धमकी दिली होती की, जर तिने त्याचे ऐकले नाही तर तो तिचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करेल. विद्यार्थिनीने सांगितले की, तिने हे व्हिडिओ आणि फोटो तिच्या माजी प्रियकराला दिले होते. याशिवाय हे व्हिडिओ आणि फोटो कोणाकडेही नव्हते.

हद्दच झाली! सायबर चोराने आमदारांनाही सोडलं नाही, चार महिला आमदारांकडून उकळले पैसे

आरोपींची चौकशी सुरू आहे पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. उपनिरीक्षक ऋचा शर्मा यांनी त्यांच्या पथकासह या प्रकरणाचा तपास सुरू केला. सायबर पोलिसांनी इंस्टाग्राम आयडीवरून आरोपीचा शोध घेतला. हा फेक आयडी उत्तम नगर येथून चालवला जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ आरोपीला त्याच्या घरातून अटक केली. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.

आरोपीने सांगितले की, तो व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहे. त्याच्या लग्नाला 8 वर्षे झाली आहेत. त्याला एक मुलगाही आहे. पण त्याला तरुण मुलींचे विचित्र वेड आहे. लोकांशी समोरासमोर बोलायला तो कचरतो. त्यामुळेच आपली आवड पूर्ण करण्यासाठी त्याने ही पद्धत अवलंबली, अशी माहिती मिळतेय.

    follow whatsapp