रीलस्टारने सौंदर्याच्या जाळ्यात ओढून अनेकांना लुबाडले, पोलिसही झाले हनीट्रॅपची शिकार, पुरावे असूनही पोलिसांचे हात बांधलेलेच

Reelstar Anshika Sinh Honey Trap : रील बनवून आपल्या अदांनी घायाळ करणाऱ्या आणि आपल्या सौंदर्याने अनेकांना जाळ्यात ओढून आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या एका रीलस्टारचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी रीलस्टार अंशिका सिंह आणि तिच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील व्हिडिओ बनवून तिने अनेकांना ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. तिच्या या हनी ट्रॅपमध्ये अनेक पोलिसही अडकल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. 

Reelstar Anshika Sinh Honey Trap

Reelstar Anshika Sinh Honey Trap

मुंबई तक

• 05:02 PM • 23 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

रीलस्टारने सौंदर्याच्या जाळ्यात ओढून अनेकांना लुबाडले

point

पोलिसही झाले हनीट्रॅपची शिकार

point

पुरावे असूनही पोलिसांचे हात बांधलेलेच

Reelstar Anshika Sinh Honey Trap : रील बनवून आपल्या अदांनी घायाळ करणाऱ्या आणि आपल्या सौंदर्याने अनेकांना जाळ्यात ओढून आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या एका रीलस्टारचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी रीलस्टार अंशिका सिंह आणि तिच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील व्हिडिओ बनवून तिने अनेकांना ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. तिच्या या हनी ट्रॅपमध्ये अनेक पोलिसही अडकल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मूल होत नसल्याच्या रागातून नवऱ्याने बायकोला संपवलं, हृदयविकाराचं कारण सांगत नातेवाईकांना...

अश्लील व्हिडिओ बनवून करायची ब्लॅकमेल

अंशिका सिंह ही उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमधील असून ती एक प्रसिद्ध रीलस्टार आहे. तिने केलेल्या गोळीबारानंतर तिची दुसरी धक्कादायक बाजू समोर आली आहे. गोळीबारांनतर पोलिसांनी केलेल्या तपासात तिच्याविषयी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. अंशिका रील बनवून आपल्या सौंदर्याचं प्रदर्शन करुन अनेकांना जाळ्यात ओढत असे. अश्लील व्हिडिओ कॉल करुन आणि ते कॉल रेकॉर्ड करुन तिने अनेकांना ब्लॅकमेल केले आहे. यातून ती मोठ्या प्रमाणात पैस उकळत असे. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी तिचा मोबाईल फोन तपासला तेव्हा त्यांना अनेक व्हिडिओ आढळून आले. तसेच तिने अनेक पोलिस अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचेही समोर आले. मात्र बदनामीच्या भीतीने कुणीही लेखी तक्रार दाखल केली नव्हती.

'अशी' सापडली अंशिका

अंशिका सिंगने सार्वजनिक ठिकाणी गोळीबार केल्यानंतर तिला अटक करण्यात आली. 20 जानेवारी रोजी ती वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या मित्रांसोबत गेली होती. त्यावेळी तिथे तिचा एका खाजगी रुग्णालयातील व्यवस्थापक विशाल मिश्रा याच्याशी वाद झाला. या वादावेळी अंशिकाने विशालच्या डोक्यावर पिस्तूल रोखली. या दरम्यान झालेल्या झटापटीत व्यवस्थापकाच्या मित्राच्या पोटात गोळी लागली. अंशिकाने यापूर्वीही विशाल मिश्रा याला बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आणि त्याच्याकडून पैसे मागितल्याचा आरोप  आहे. तसेच पैसे न दिल्यास खोट्या बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकीही तिने विशालला दिली होती.

हे ही वाचा : ट्राफिक सिग्नलवर गुलाबाची फुलं विकणाऱ्या 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, रिक्षाचालकाचे सैतानी कृत्य, 300 सीसीटीव्हींच्या सहाय्याने आरोपीला अटक

तक्रार देण्यास कुणीच नाही तयार

पोलिसांनी अंशिका सिंह आणि तिच्या सहकाऱ्यांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. पोलिस तपासात असेही समोर आले आहे की अंशिकाविरुद्ध आलिशान कार चोरी आणि फसवणुकीचे गुन्हे आधी दाखल आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोबाइल डेटावरून ब्लॅकमेलिंगचे ठोस पुरावे मिळाले आहेत. मात्र अश्लील व्हिडिओ आणि खंडणी प्रकरणात तिच्या विरोधात अजूनपर्यंत कुणीच तक्रार दाखल न केल्याने पोलिसांना तिच्यावर कारवाई करण्यात अडचणी येत आहेत. 

    follow whatsapp