CRPF जवानाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, हॉटेल बुक करुन स्वत:च्याच अल्पवयीन मुलींवर करायचा अत्याचार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मुंबई तक

11 Mar 2026 (अपडेटेड: 11 Mar 2026, 09:15 AM)

Crime News : विशेष पॉक्सो न्यायालयाने बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या एका संतापजनक प्रकरणात निकाल सुनावला आहे. आपल्याच पोटच्या दोन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका सीआरपीएफ जवानाला पॉक्सो न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच 30 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास त्याला अतिरिक्त तीन महिन्यांचा कारावास भोगावा लागणार आहे. या निकालामुळे पीडित मुलीला अखेर न्याय मिळाला आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

CRPF जवानाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा,

point

हॉटेल बुक करुन स्वत:च्याच अल्पवयीन मुलींवर करायचा अत्याचार

point

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Crime News : विशेष पॉक्सो न्यायालयाने बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या एका संतापजनक प्रकरणात निकाल सुनावला आहे. आपल्याच पोटच्या दोन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका सीआरपीएफ जवानाला पॉक्सो न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच 30 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास त्याला अतिरिक्त तीन महिन्यांचा कारावास भोगावा लागणार आहे. या निकालामुळे पीडित मुलीला अखेर न्याय मिळाला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'तू आम्हाला फ्रिजमध्ये सापडशील..' मित्रांनी केली चेष्टा, तरुणीने मुंबईतील राहत्या घरातच स्वत:ला संपवलं

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण 2022 मधील असून जमालपूर पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या बापाने मुलींचे रक्षण करायला हवे होते, तोच हॉटेलमध्ये रूम बुक करून तिच्यावर अत्याचार करत असे. बाप-लेकीच्या पवित्र नात्याला कलंकित करणाऱ्या या कृत्याविरोधात दोषीच्या पत्नीनेच हिंमत दाखवून पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पत्नीने आपल्या पतीवर पोटच्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप लावला होता, त्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवून आरोपीला अटक केली होती.

सीआरपीएफचा माजी जवान आणि एनएसजीमध्ये सेवा

या प्रकरणातील दोषी हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (CRPF) माजी जवान असून त्याने एनएजी (NSG) मध्येही सेवा बजावली आहे. इतकेच नव्हे तर मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी कारवाई करणाऱ्या टीमचाही तो भाग होता. मात्र, देशाचे रक्षण करणाऱ्या या जवानाने स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. हॉटेलमध्ये रूम बुक करून तो आपल्या अल्पवयीन मुलीचे शोषण करत असे. याप्रकरणी त्याच्या पत्नीनेच हिंमत दाखवून पतीविरोधात तक्रार दाखल केली होती.

हे ही वाचा : फेमस रील स्टार अरुण तुपेचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये हळहळ, घरातच मृतावस्थेत आढळला

न्यायालयीन प्रक्रिया

विशेष सरकारी वकील (पॉक्सो) प्रीतम कुमार वैश्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर एकूण 11 साक्षीदार नोंदवण्यात आले. या सर्व साक्षीदारांनी आरोपांचे समर्थन केले. उपलब्ध पुरावे आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने 24 फेब्रुवारी 2026 रोजी आरोपीला दोषी ठरवले होते. त्यानंतर सोमवारी (9 मार्च) शिक्षेवर सुनावणी करताना, भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांनुसार त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.