Chandrapur Lok sabha 2024: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

24 Dec 2023 (अपडेटेड: 19 Apr 2024, 05:56 PM)

Chandrapur Lok sabha 2024: चंद्रपूर लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे.

chandrapur lok sabha election results 2024

chandrapur lok sabha election results 2024

follow google news

Lok sabha Election 2024 Chandrapur: चंद्रपूर: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या (Chandrapur Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (chandrapur lok sabha election results 2024)

हे वाचलं का?

LIVE UPDATE: 

  • चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात दुपारी 5 वाजेपर्यंत 55.11 टक्के मतदान
  • चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 43.48 टक्के मतदान
  • चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 30.96 टक्के मतदान पार पडलं
  • चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.44 टक्के मतदान
  • याशिवाय वंचित बहुजन आघाडीने देखील इथे राजेश वारलुजी बेले यांना तिकीट दिलं आहे. 
  • चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रसेच्या प्रतिभा धानोरकर अशी थेट लढाई आहे.
  • पहिल्या टप्प्यात चंद्रपूरमध्ये मतदान होणार आहे.
  • महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी पहिल्या टप्प्याचं मतदान हे 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. 

लोकसभा निवडणूक 2024: चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार

  1. भाजप - सुधीर मुनगंटीवार

  2. काँग्रेस - प्रतिभा धानोरकर

  3. वंचित बहुजन आघाडी - राजेश वारलुजी बेले

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: बाळू धानोरकर (विजयी उमेदवार- काँग्रेस) 45.18% मतं

  2. वर्ष- 2014: हंसराज अहिर (विजयी उमेदवार- भाजप) 45.78% मतं

  3. वर्ष- 2009: हंसराज अहिर (विजयी उमेदवार- भाजप)  33.55% मतं

  4. वर्ष- 2004: हंसराज अहिर (विजयी उमेदवार- भाजप)  43.51% मतं

  5. वर्ष- 1999: नरेशकुमार पुगलिया (विजयी उमेदवार- काँग्रेस) 41.66% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

    follow whatsapp