Parbhani Lok sabha 2024: परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

26 Dec 2023 (अपडेटेड: 27 Apr 2024, 11:32 AM)

Parbhani Lok sabha 2024: परभणी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे.

parbhani lok sabha election results 2024

parbhani lok sabha election results 2024

follow google news

Lok sabha Election 2024 Parbhani : परभणी: परभणी लोकसभा मतदारसंघाच्या (Parbhani Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. परभणी लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (parbhani lok sabha election results 2024)

हे वाचलं का?

LIVE UPDATE: 

  • परभणी लोकसभा मतदारसंघात सांयकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 60.09 टक्के एवढं मतदान झालं आहे.
  • दुसरा टप्प्यात 8 मतदारसंघात सायं. 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 59.63% मतदान झाले. अशी माहिती मुख्य निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.
  • परभणी लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 53.79 टक्के एवढं मतदान झालं आहे.  
  • परभणी लोकसभा मतदारसंघात दुपारी 03 वाजेपर्यंत एकूण 44.49% एवढं मतदान झालं आहे.
  • परभणी लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 33.88 टक्के एवढं मतदान झालं आहे.
  • परभणी लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 21.77 टक्के एवढं मतदान झालं आहे.
  • परभणी लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 9.72 टक्के एवढं मतदान झालं आहे.  
  • दुसऱ्या टप्प्यात परभणीमध्ये मतदान होणार आहे.
  • महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 8 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. 

 

लोकसभा निवडणूक 2024: परभणी मतदारसंघातील उमेदवार

  1. शिवसेना (ठाकरे गट) - संजय (बंडू) जाधव

  2. रासप - महादेव जानकर (NCP कोट्यातून)

  3. वंचित - पंजाबराव डख

 

    follow whatsapp