Narendra Modi : ''विरोधकांना पश्चाताप होईल''! Electoral Bond वरून PM मोदी असं का म्हणाले?

प्रशांत गोमाणे

31 Mar 2024 (अपडेटेड: 31 Mar 2024, 11:01 PM)

Narendra Modi ThanthiTV Interview : कोणती एजेंन्सी सांगू शकेल, पैसा कुठून आला होता? कुठे गेला आणि कोणी खर्च केला असेल? मोदीने इलेक्टोरल बाँड बनवला म्हणून आज तुम्हाला कळतंय, पैसा कुणी घेतला? किती दिला? नाहीतर आधी काहीच कळायचं नाही, असे मोदी यांनी स्पष्ट सांगितले.

pm narenra modi interview with thanthitv electoral bond allgation lok sabha election 2024

मी इलेक्टोरल बॉन्ड बनवला म्हणून तुम्हाला आज कळतंय पैसा कुणी घेतला?

follow google news

Narendra Modi ThanthiTV Interview :  देशातील विरोधी पक्षांनी निवडणूक रोख्याच्या मुद्यावरून भाजपवर आरोपांचे रान पेटवले होते. देशातला  हा सर्वांत मोठा घोटाळा असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. याच आरोपांवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत उत्तर दिले आहे. ''जी लोक (विरोधक)  याला (इलेक्टॉरल बॉन्ड) घेऊन इतका गदारेळ करतात, त्यांना पश्चाताप होणार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. तसेच मी इलेक्टोरल बॉन्ड बनवला म्हणून तुम्हाला आज कळतंय पैसा कुणी घेतला? किती दिला?  नाहीतर याआधी काय कळायंच?'' असं म्हणत काँग्रेसवर त्यांनी हल्ला चढवला.  (pm narenra modi interview with thanthitv electoral bond allgation lok sabha election 2024) 

हे वाचलं का?

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थंटी टीव्हीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले आहे.  इलेक्टोरल बाँड वरून होत असलेल्या आरोपावर बोलताना मोदी म्हणाले की, ''मला या विद्वानांना (विरोधकांना) विचारायचंय, 2014 च्या आधी जितक्या निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत खर्च तर झालाच असेल ना, विना खर्चाच तर काहीच होणार नाही. कोणती एजेंन्सी सांगू शकेल, पैसा कुठून आला होता? कुठे गेला आणि कोणी खर्च केला असेल? मोदीने इलेक्टोरल बाँड बनवला म्हणून आज तुम्हाला कळतंय, पैसा कुणी घेतला? किती दिला? नाहीतर आधी काहीच कळायचं नाही, असे मोदी यांनी स्पष्ट सांगितले.

हे ही वाचा :Lok sabha Election 2024 : 'वंचित'ची दुसरी यादी जाहीर, मविआला बसणार झटका?

मी असं काय केलं आहे, ज्यामुळे मला लाज वाटेल. जी लोक याला (इलेक्टोरल बाँड) घेऊन नाचतायत आणि गदारोळ करतायत त्यांना पश्चाताप होणार आहे, असे मोदी म्हणाले आहेत.  कोणतीही व्यवस्था संपुर्ण नसते. तिच्यातल्या चुकांना सुधारता येईल. त्यामुळे इलेक्टोरल बाँडमुळे तुम्हाला कळतेय, इथून हा पैसा इथे गेलाय आणि इथे खर्च झालाय? असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 

तपास यंत्रणांच्या गैरवापरावर काय म्हणाले?

तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून नेहमीच केला जातो. या आरोपावर बोलताना मोदी म्हणाले की,  ईडी ही तपास यंत्रणा आणि पीएमएलएचा कायदा आम्ही आल्यावर बनला का? नाही ना आमच्या आधीच होता. आता प्रश्न हा आहे, ईडीने काय काम केले आहे? ती स्वतंत्र यंत्रणा आहे, स्वतंत्रपणे काम करते. ना मी त्यांना कारवाईपासून थाबंवतो, ना कारवाईला पाठवतो,असे पतप्रधान मोदी यांनी सांगितले. 

हे ही वाचा :Anjali Damania : छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार?

तसेच ईडीकडे 7000 केसेस आहेत. त्यामध्ये 3 टक्के पेक्षा कमी राजकीय नेत्यांची प्रकरणे आहेत.  काँग्रेसच्या काळात 5 ते 10 वर्षाच्या काळात फक्त 35 लाख रोकड जप्त केली गेली आणि आम्ही आमच्या काळात 2200 करोड रोकड जप्त केली. आता नोटांची माळ पकडल्या जातायत, वॉशिंग मशीनमध्ये, घरातल्या पाईप, बेडमध्ये पैसे सापडतायत. आम्ही जे पैसै पकडले होते त्यामधले 17 करोड रूपये आम्ही पुन्हा देऊन टाकले आहेत, असे मोदी यांनी सांगितले. 

भापजपमध्ये आल्यावर केसेस बंद होतात? यावर बोलताना मोदी म्हणाले?  तुम्ही मला एक केस दाखवा जी ईडीने बंद केली आहे. 10 वर्षात यांनी कधी पीएमएलए कायद्याचा वापर केला नाही. ईडीला काम करता न यावे यासाठी कोर्टाला हत्यार बनवण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना माहितीय भ्रष्टाचार विरूद्ध मोदींची लढाई थांबणार नाही. त्यामुळे त्यांना वाटते की या एजेन्सीचे कायदे संपवून टाकावे,जेणेकरून देशात भ्रष्टाचाराची कारवाईच करता येणार नाही, असे मोदी यांनी सांगितले आहे. 

    follow whatsapp