Prakash Ambedkar : 'वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला'! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

प्रशांत गोमाणे

28 Mar 2024 (अपडेटेड: 28 Mar 2024, 04:18 PM)

Prakash ambedkar criticize Sanjay raut : प्रकाश आंबडेकर यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्वीट करून संजय राऊतांवर टीका केली आहे. संजय, किती खोट बोलशील? तुम्ही तर सहकारी असून पाठीत खंजीर खुपसलात, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

prakash ambedkar criticize thackerey mp sanjay raut on vanchit and maha vikas aghadi allince maharashtra politics

तुम्ही तर सहकारी असून पाठीत खंजीर खुपसला,

follow google news

Prakash ambedkar criticize Sanjay raut : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत युतीमध्ये सामील होणार होती. मात्र बुधवारी अचानक प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील वंचितची उमेदवारी जाहीर करून युती तुटल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आंबेडकरांच्या या निर्णयाचा महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकांसोबत(Prakash Ambedkar) चर्चा सुरु असल्याची भूमिका मांडली होती. राऊतांच्या (Sanjay Raut) या भूमिकेवर आता प्रकाश आंबेडकरांनी संताप व्यक्त करत जोरदार टीका केली आहे.  (prakash ambedkar criticize thackerey mp sanjay raut on vanchit and maha vikas aghadi allince maharashtra politics)

हे वाचलं का?

प्रकाश आंबडेकर यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्वीट करून संजय राऊतांवर टीका केली आहे. संजय, किती खोट बोलशील? तुम्ही तर सहकारी असून पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोत एक माणुस दाखवला गेला आहे, या माणसाला वंचित असे नाव देण्यात आले आहे. तर दुसऱ्या माणसाच्या हातात चाकु दाखवला आहे. हा चाकु दाखवलेला माणूस संजय राऊत आहे. त्यामुळे संजय राऊतांनी वंचितच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. हे ट्विट प्रकाश आंबेडकरांकडून सुरूवातीला डिलीट करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली होती.  

 

हे ही वाचा :  रश्मी बर्वेंचं जात प्रमाणपत्र रद्द, काँग्रेसचा दुसरा उमेदवार कोण?

आंबेडकरांच्या ट्विटमध्ये काय? 

संजय, किती खोट बोलशील? जर तुमचे आणि आमचे विचार एक असतील तर आम्हाला बैठकीला बोलवत का नाही? 
6 मार्चला फोर सीजन्स हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या प्रतिनिधीला बोलावलात का नाही? 
आजही आपण वंचितला आमंत्रित केल्याशिवाय बैठक कशी घेताय? 
तुम्ही तर सहकारी असून पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. 
आम्हाला माहिती आहे. सिल्व्हर ओकवरील बैठकीत आपली वागणूक कशी होती. अकोल्यात आमच्याविरोधात उमेदवारी देण्याचं ठरलं, हे खरे आहे का? 
सिल्व्हर ओक्स येथील आमच्या बैठकीत आम्ही कोणती वृत्ती घेतली हे आम्हाला माहीत आहे! अकोल्यात उमेदवारी देण्याचे प्रकरण आमच्या विरोधात ठेवण्यात आले हे खरे नाही का?
तुम्ही कोणत्या प्रकारचे नाते निर्माण करत आहात? एका बाजूला युतीचा आभास आहे आणि दुसरीकडे आम्हाला खाली पाडण्याचे कारस्थान!
असे विचार तुमचे आहेत? 

हे ही वाचा : "निवडणूक लढवायला पैसेच नाही', केंद्रीय अर्थमंत्र्यांनी भाजपचं तिकीट नाकारलं

सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत अकोल्यात आमच्याविरोधात उमेदवारी देण्याचं ठरलं, हे खरे आहे का? असा सवाल देखील  प्रकाश आंबेडकरांनी राऊतांना विचारला आहे. या टीकेवर आता संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

 

    follow whatsapp